
राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असून, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातल्या तांबवे इथल्या साखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभ आणि शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावर्षी राज्यात पाऊस कमी झाला आहे, त्यातच परतीचाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर करावा. ठिबक, तुषार या सिंचन पद्धतीचा वापर करून शेती पिकाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घ्यावं असं पवार म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत