राज्य कर निरीक्षक बुध्दजय भालशंकर आणि मोनाली भालशंकर यांचा सत्कार संपन्न।

सम्यक अकॅडमी सोलापूरच्यावतीने स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन केंद्र चालविण्यात येते. या अकॅडमीचे तीन स्पर्धक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी म्हणून रुजू झाले. तसेच गट क परीक्षेत 12 स्पर्धक पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. याबाबत बुद्धजय भालशंकर आणि मोनाली भालशंकर यांचा नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर धम्मचक्र प्रवर्तन दिनी सोलापूरचे अपर जिल्हा अधिकारी मा तुषार ठोंबरे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी निवृत्त पोलीस अधीक्षक अशोक भालेराव, उपअधीक्षक रमेश सरवदे, उपनिरीक्षक केरु जाधव, अंगद जेठीथोर, विजयकुमार कांबळे, प्राचार्य वसिष्ठ सोनकांबळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत