मोरक्कोमध्ये झालेल्या भूकंपात दिसला एक रहस्यमय प्रकाश.

मोरक्कोमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळं मोठ्या प्रमाणावर जिवितहानी झाली आहे जवळपास तीन हजाराहून अधिक लोकांनी जीव गमावला आहे. याच वेळी भूकंपाच्या आधी एक रहस्यमय प्रकाश दिसला असल्याचा दावा केला जातो.
भूकंपातील मृतांचा आकडा 3 हजारांवर गेला आहे. एटलस डोंगररांगेत भूकंपाचे केंद्र असल्याचे समोर आले होते. खरं तर अफ्रिकन देशात भूकंप येण्याच्या घटना काही नवीन नाहीयेत. मात्र, गेल्या तीन दशकातील हा सर्वात विनाशकारी भूकंप होता. भूकंपानंतर अनेक वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात काही वेगळाच दावा करण्यात आला आहे. भूकंपाच्या काही क्षण आधी एक रहस्यमयी प्रकाश दिसला होता, असा दावा करण्यात येतोय. हा नक्की काय प्रकार आहे. ही नैसर्गिक आपत्ती आहे की कोणीतरी घडवून आणलं आहे का, अशा शंका समोर येत आहेत. नेमका काय आहे हा प्रकार जाणून घेऊया.
व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर ही नैसर्गिंक आपत्ती नसून घडवून आणलेला भूकंप असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एखाद्या हायटेक लॅबमधून हे कारस्थान करण्यात आलं आहे. तर काहींनी अमेरिकेच्या मिलिट्री प्रोगॅम HAARP (हार्प) कडे बोटं दाखवलं आहे. अलास्कामध्ये असलेली वेधशाळात एक अमेरिकन संस्था आहे. यात रेडिओ ट्रान्समीटच्या मदतीने वातावरणात बदल केले जातात नंतर त्याचा अभ्यास करण्यात येतो. 2022मध्ये या अनेक मोठे प्रोजेक्टवर काम सुरु करण्यात आलं होतं. मात्र, त्यामुळं भूकंप आणता येऊ शकतो का, हे सांगण्यात आले नव्हते. जगात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींसाठी अनेकदा हार्पला संशयाच्या फेऱ्यात अडकला होता. अनेक देशात आलेल्या भूकंप, त्सुनामी आणि भूस्लखनासाठी ही रिसर्च संस्थेला दोषी ठरवण्यात आले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत