
माजी क्रिकेटपटू आणि भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांच्यावर दोन आठवड्यांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. काल दिल्लीत त्यांचे निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. १९७० साली पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. १९६७ ते १९७९ या १२ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी भारतासाठी ६७ कसोटी सामन्यात २६६ बळी घेतले आहेत तर १० एकदिवसीय सामन्यात सात बळी घेतले आहेत.त्यांनी २२ कसोटी सामन्यांसाठी भारताचं कर्णधारपद भूषवलं आहे. बिशन सिंग बेदी हे फिरकी गोलंदाजी साठी प्रसिद्ध होते. .बिशन सिंग बेदी यांच्या निधनाबद्दल सर्वांनी दुःख व्यक्त केलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत