भारताने आज गाझामधील पॅलेस्टिनींना वैद्यकीय मदत आणि आपत्ती निवारण साहित्य पाठवले.

इस्राइली सैन्याने हमासच्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून गाझावर हल्ले केले होते. ज्यात कमीतकमी 1,400 लोक मारले गेले. हमास संचालित आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, काउंटर स्ट्राइकमध्ये 4,300 हून अधिक पॅलेस्टिनी, प्रामुख्याने स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत माहिती दिली आहे. “भारताने पाठवलेल्या मदतीत जीवनावश्यक औषधे, शस्त्रक्रिया वस्तू, तंबू, स्लीपिंग बॅग, ताडपत्री, स्वच्छताविषयक उपयुक्तता आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत