भोंदू वैद्य ,,, मी आणि माझे टक्कल ,,,!

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
ऍड अविनाश टी काले अकलूज
9960178213
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
काल परवा जुन्या स्मृती चाळत असताना माझा जुना शालेय फोटो सापडला , तसा तो फोटो मला खूप आवडतं होता , फोटो आयडेंटी साईज चां होता , आणि शालेय कामकाजासाठी ओळखपत्र म्हणून हवा होता , ब्लॅक अँड व्हाईट,,
अकलूज च्या मारुती मंदिरा समोर असणारे फोटोग्राफर हरी बनसोडे यांनी तो खेचला होता ,
एका विशिष्ट पोज मध्ये बसवून थोडी मान तिरकी करून तो काढला गेला होता , करामत फोटोग्राफरची असली तरी चेहरा नैसर्गिक होता ,
डोक्यावरील मऊ मुलायम केसाचा कोंबडा वळणाजवळं पाडलेला , नुकतीच मिसरूड फुटलेली , कोवळा ,,
आपणच आपल्या प्रेमात पडावं इतका सुंदर ,,,
आज माझ्या कडे पाहिल्या नंतर तुमचा विश्वास बसणार नाही इतका सुंदर होतो मी , माझे हृदय कोमल होते , निरागस होते , त्यावर अजून कशाचेच वार झाले नव्हते ,,
पुढे कॉलेज ला गेलो , आणि युवा अवस्थेत त्या हृदयावर वार होत गेले , एका योध्या प्रमाणे ते “कोमल वार” त्या हृदयाने झेलले ,, आणि हळू हळू ते कठोर बनत गेले ,,
तसतसे चेहऱ्या वरील कोमलता आणि डोक्यावरील केस दोन्ही निघून चालले ,,
जगाचे व्यवहार जानण्या च्या स्थितीत आल्याने ते थोडेसे व्यवहार वादी , तर्क संगत विचार करणारे बनले ,,
मी 1986ला सोलापूर मध्ये लॉ कॉलेज ला एडमिशन घेण्यासाठी पाऊल टाकले , एक अज्ञात भीती मनात होती ,, अज्ञात म्हणून न मरण्याची,,,
म्हणून खिशात कागदी चिठ्ठ्या ठेऊन त्यावर माझे नाव आणि पत्ता लिहिलेला असायचा ,,
भीती मरणाची नव्हती ,, किमान घरच्यांना कळावे ही भावना होती ,,
खिशात फारसे पैसे नसल्याने सगळा प्रवास हा पायी चालत करत होतो ,,
कॉलेज जवळ असल्याने बोरामनी नाक्यावरील झोपडपट्टी एरिया तील रस्त्याच्या कडेला असलेल्या चांगल्या खोल्यात राहत होतो ,,
माझ्या वर्गात प्रवेश घेतलेले रू ल येडके सर हे नॉर्थ कोट प्रशालेत विव्हींग टीचर होते ,,
त्याच शाळेत रामपूरे या जगप्रसिद्ध आर्किटेक्ट यांचे मोठे बंधू ही होते ,,
मी तिथे नेहमी जात असे , आणि माझ्या हून मोठ्या असलेल्या माणसात सहजी मिसळत असे ,,
तेथून मी माझ्या खोली कडे जाताना सिध्देश्वर मंदिराच्या पुढील रस्त्याने , गड्डा मैदानाच्या बाजूने विजापूर वेस कडे जावे लागत असे तेथून कौतम चौक ,, ते बोरामणी नाका ,,,
रस्त्याच्या कडेला एक वैदू कांहीं जुडी बुट्टी घेऊन पथारी पसरून बसलेला होता ,
एखादे सावज हेरायच्या तयारीत ते नेहमी असत ,, मी त्याचे बाजूने पुढे निघालो तर त्याने मला ,,शुक शुक करून बोलावले ,,
मला ही काम कांहीच नसल्याने कतूहल म्हणून मी गेलो ,,
त्याने माझ्या चेहऱ्या कडे पाहिले ,, थोडक्यात आपद मस्तक न्याहाळले ,,
मला हात पुढे करण्यास सांगून त्याने तो हातात घेतला ,,
नाडी परीक्षण केले ,, आणि म्हणाला
भाऊ तुम्हाला वाईट वाईट स्वप्न पडतात ,,,, !
मी म्हणले नाही ,,
वाईट म्हणजे वाईट नाही ,,, स्वप्नात तुम्हाला सुंदर मुली दिसतात ,,,
मी म्हणले नाही ,,,
अश्या सुंदरच काय कोणत्या ही मुली माझ्या स्वप्नात येत नाहीत ,,,
त्याला कसे कळणार ? जो विद्यार्थी कोवळ्या वयात चळवळीचे धडे गिरवत होता , 10वी त असताना ज्याने मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव निलंगेकर यांच्या रस्त्यावर दगड टाकून त्यांचा रस्ता बंद केला होता ,
जी व्यक्ती आंबेडकर वाद , नव मानवता वाद समजून घेत होता ,
मार्क्स , फिडेल कॅस्ट्रो, चे गुएवरा वाचत क्रांती ची स्वप्न पाहत होता ,,
त्याला कुठून सुचणार असले प्रेमाचे चाळे ?
पण तो जिद्द सोडण्यास तयार नव्हता ,,
नाईट फॉल , ते हस्त मैथुन सारे विचारून झाले ,,
आणि अश्या खाजगी बाबी कोण उघडपणे कुणाला सांगते?
शेवटी त्याने त्याचे ब्रम्हास्त्र बाहेर काढले
भाऊ तुमच्या अंगात उष्णता वाढली आहे ,,
आणि त्या मुळे तुमचे केस गळून तुम्हाला टक्कल पडले आहे ,,
मी तुमचा थोरला भाऊ म्हणून औषध देतो ,,
दुसऱ्या कडून दीड दोन हजार घेतो ,, तुमच्या कडून फक्त 700रुपये घेतो ,,
माझे औषधं घ्या ,,
विनोद खन्ना ही तुमच्या पुढे झक मारेल,,,,
क्षणभर मी ही विचारात पडलो ,,
जिथे 300रुपयात घर भाडे आणि खानावळ महिनाभर भागत होती तिथे हा 700रुपये मागत होता
ते देणे माझ्या कुवतीच्या बाहेर होते ,,
अचानक माझे तर्क संगत विचारचक्र आपोआप सुरू झाले ,,,,
मी त्याला म्हणालो ,,
तुम्ही माझे थोरले भाऊ ,,, म्हणून माझी काळजी करता ,,,
माझे ही कर्तव्य आहे मी थोरल्या भावाची काळजी केली पाहिजे ,,,,
तो कान देऊन ऐकू लागला ,,,
मी पुढे म्हणालो ,,
तुम्ही सुशीलकुमार जी शिंदे साहेब यांचे नाव ऐकून असाल?
त्यांना कोण ओळखत नाही ? तो म्हणाला ,,,,
पण तुम्ही त्यांना नीट पाहिलेले दिसत नाही ,,
भाऊ माझ्या डोक्यावरचे थोडे थोडे केस चालले आहेत ,,
साहेबाना तर पूर्ण टक्कल पडलेले आहे ,,
मी असा फाटका विद्यार्थी ,,
तुम्ही साहेबांच्या कडे जावा ,, आणि साहेबांना हे औषध फुकट द्या ,,, त्यांना गुण आला की तेच खुश होऊन तुम्हाला नक्की मोठी रक्कम देतील ,,
लहान भाऊ म्हणून त्यातील थोडीशी रक्कम मला द्यावी असे वाटले तर द्या ,,,
नाही दिले तरी मला वाईट वाटणार नाही ,,,
असे बोलताच त्याने मला कोपरापासून हात जोडले ,,
आणि म्हणाला ,,
भाऊ इथे भेटला ,,,, आत्ता कुठेच भेटू नका 😂😂😂😂😂😂
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत