जागतिक कामगार आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने..!
शहीदांना श्रद्धांजली वाहून तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या विचारांना व्हिजनला अभिवादन करुन आपलीं जबाबदारी झटकणाऱ्या पळकुट्या गद्दार कामगार आणि नागरिकांनो…..
१. आज इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या खाजगीकरणाबद्दल बोलणार आहात की नाही ?
२. आज राज्यात सगळ्याचं ठिकाणीं कामाचे तास १२ झालेले आहेत त्यावर बोलणार की नाही ?
३. आज किती कंपन्यांत PF कट होतो की नुसताच TDS कापून पगार मिळतो यावर बोलणार की नाही ?
४. भांडवलदारांनी किमान वेतन कायदा धाब्यावर बसवला आहे त्यावर बोलणार की नाही ?
५. आज किती कंपन्यांत, कारखान्यात फॅक्टरी ॲक्ट नुसार सोयी सुविधा मिळतात यावर बोलणार आहात की नाही ?
६. Industrial Dispute act कशासाठी असतो त्याची आजची काय हालत केलीय त्यावर बोलणार आहात की नाही ?
७. सरकारीकरणाचे खाजगीकरण झाले आणि खाजगीकरणाच्या नावाखाली कांत्राटीकरण आले त्यावर बोलणार आहात की नाही ?
८. किती महिलांना आता मातृत्व सुट्टीचा भरपगारी लाभ मिळतो याबद्द्ल बोलणार का ?
९. कंत्राटीकरणाच्या नावाखाली आपल्या पगारातून दरमहा १५ ते ३०% खाणारे लेबर कॉन्ट्रॅक्टर, नगरसेवक, आमदार ह्यांच गच्ची धरायची हिम्मत आहे का ?
१०. गाई पेक्षा जास्त भीषण विषय असलेल्या महागाईच्या विरोधात DA (महागाई भत्ता) कोणत्या ठिकाणी आता मिळतो याचा जाब विचारणार आहात का ?
११. आज देशात जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरण आणि कंत्राटीकरणाच्या नावाखाली सगळ्या प्रकारचा कामगार कष्टकरी, नाका कामगार, घरकामगार ह्यावर आज कोणती वेळ आलीये कोणामुळे आली आहे याचा जाब विचारणार का ??
१२. कामगारांच्या विरोधात कायदे तयार होत असताना मुग गिळुन गप्प राहिलेल्या युनियन आणि त्यांचे नेते ह्यांना जाब विचारणार की नाही???
१३. आज देशात बेरोजगारी उपासमार भूकबळी यामुळे कामगारांचे होणारे हाल त्यांची पोटासाठी सुरू असलेली स्थित्यंतरे, बांधकाम मजुरांचा त्यांच्या मुलांचा प्रश्न, मॅनहोल मध्ये उतरून, अतीशय घाणेरडी गलिच्छ आणि जीव धोक्यात टाकून सुद्धा केलेली कामे ज्यामुळे आजवर तुम्हाला कोणीही सन्मान दिला अश्या नीच कामात आपला जीव गमावणाऱ्या तसेच अश्या कामात काम करताना कधीही रिटायर न होता आधीच मरणाऱ्या प्रत्येक कामगाराच्या अस्मितेचा स्वाभिमानाचा, आत्मसन्मानाचा त्यांच्या ठरवून केलेल्या सरकारी खुनाचा जाब विचारणार आहात की नाही ???
१४. शेवटचं अशी सगळी परिस्थीती ज्यांच्यामुळे आज देशात उद्भवली आहे अश्या नालायक सरकारला पाडण्यासाठी आपल्या वस्त्यांत, चाळीत, बिल्डिंगमध्ये, कॉम्प्लेक्समध्ये आणि रस्त्यावर येवुन ही लढाई लढून मतदान केंद्रावर स्वतः आणि लोकांना नेवून हे धर्मांध, जात्यांध, भांडवली, शोषणावर आधारित सरकार पाडणार का ???
की परत,
कामगार एकजुटीचा विजय असो
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अश्या घोषणा देत अघोषित आणीबाणीचा romanticism अनुभवत आपला सेल्फी विडिओ काढत वांझ आणि नपुंसक निषेध नोंदवणार ?
निर्णय घ्या ….!
महेन्द्र अशोक पंडागळे
समन्वयक सदस्य
प्रागतिक रिपब्लिकन आघाडी
महाराष्ट्र राज्य.
7678044677.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत