माढा मतदार संघात दबाव तंत्राचा वापर झाल्याची सर्वत्र चर्चा; शरद पवार गटाला पाठिंबा देताच जप्तीची नोटीस आणि महायुतीला पाठिंबा देताच कारखान्याला जप्ती पासून दिलासा ?
पुणे : माढा येथील राजकारणात उघडपणे दबावतंत्र दिसून येत असल्याची सर्वत्र चर्चा चालू आहे. महायुतीचे नेते यंत्रणा हाताशी धरून जनतेनेच दिलेली ताकत जनतेच्याच विरोधात वापरत आहेत. पण अशा कट कारस्थनातून खरतर आपला खरा दुष्ट चेहरा उघड करत आहे अशी प्रतिक्रिया जनमानसात गडद होत आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला कांहीं दिवसांपूर्वी जप्तीची नोटीस आलो होती. परंतु आता मात्र लोकसभा 2024 साठी माढा मतदारसंघात शरद पवार ऐवजी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला जप्तीच्या कारवाईतून मोठा दिलासा मिळाला आहे अशी चर्चा रंगली आहे.
राज्य सहकारी बँकेने थकबाकीच्या कारणावरून पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई केली. ही कारवाई बेकायदा आणि लहरीपणाची असल्याची टिप्पणी करीत कारखान्याची गोदामे सीलमुक्त करून पाच मेपर्यंत त्यांचा ताबा पुन्हा कारखान्याकडे देण्याचे आदेश पुण्याच्या कर्ज वसुली लवादाने दिले.
माढ्यात विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार गटाने धैर्यशील मोहिते पाटील यांना उतरवले आहे. मोहिते पाटील यांना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर शिखर बँकेने चारशे कोटी रुपयांच्या थकबाकीचे कारण देऊन अभिजित पाटील यांच्या कारखान्याची तीन गोदामे सील केली. त्यामध्ये सुमारे १४ हजार क्विंटल साखर अडकून पडली होती. या कारवाईनंतर अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लगेचच माढा आणि सोलापूर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आणि काय चमत्कार ! राज्य शासनाची कारवाई बेकायदेशीर असल्याचा कर्ज वसुली लवादाचा निकाल आला आणि अभिजित पाटील तणावमुक्त झाले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, अभिजित पाटील यांना जनतेचा पाठिंबा असून, त्यांच्या मनात आमच्याबद्दल आस्था आहे. ती लक्षात घेऊन सत्ताधाऱ्यांनी त्यांना अडचणीत आणले. त्यांच्या कारखान्यातील दहा लाख टन साखर जप्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे, कामगारांचे वेतन अडकून बसले. शेवटी पाटील यांनी वेगळा निर्णय घेतला. त्याबाबत मी त्यांना दोष देत नाही. परंतु, राज्यकर्ते कोणत्या टोकाला जातात, याचे हा कारखाना उत्तम उदाहरण आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत