मुंबई- मडगाव वंदे भारतची गती वाढणार

१ नोव्हेंबर २०२३ पासून कोकण रेल्वे नॉन मान्सून वेळापत्रक लागून होणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्वच मेल एक्सप्रेस गाड्यांचे वेग वाढणार आहे. परिणामी सर्वच मेल-एक्सप्रेस गाड्याच्या प्रवासाचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे वंदे भारत ट्रेनच्या प्रवास कालावधीत दहा तासांवरून अवघ्या ७ तास ४५ मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे साधारणतः मुंबई- मडगाव वंदे भारत ट्रेनच्या प्रवासाच्या वेळ दोन तास वाचणार आहे. याशिवाय वंदे भारत ट्रेनसह कोकण रेल्वे मार्गावर धावणार साधारण ५० मेल-एक्सप्रेस गाड्यांची गती वाढणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात कोकण सर्वाधिक पाऊस कोसळतोय. परिणामी कोकण रेल्वेवर दरडी कोसळण्याचा घटना घडतात. याशिवाय हवेती दृष्यमानताही कमी होते. त्यामुळे प्रवासी सुरक्षा आणि खबरदारी म्हणून कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी मान्सून वेळापत्रक लागू केले जातात.
त्यामुळे सर्वच रेल्वेगाड्यांच्या वेगावर मर्यादा आल्या जातात. यंदाही कोकण रेल्वेने १० जून ते ३१ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत मान्सून वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. त्यामुळे वंदे भारत ट्रेन्सह कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या साधारणता ५० मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेगावर मर्यादा आणल्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत