
विद्रोही राजू भगत रा.हिंगणघाट जिल्हा वर्धा. मो.नं.९८२२४९०४४३.
बुलबुल के पैरो मे कभी बाज नही होते.कमजोर और बुजदिलो के हाथो में कभी राज नही होते.जिनको पढ जाती है आदत सर झुक कर चलने की.उनके सर पर कभी ताज नही होते…
आज जरासा बुद्ध कळला आणि बा भीमा तुझ्या चळवळीचा धाग झालो मी.माहीत नाही जराशी ठिणगी आत घेऊन बसलो होतो मी.आणि वाचण्याच्या नादात नकळत माझ्या आयुष्यात आलास तू.आणि आज या विद्रोहाची आग झालो मी…
बाबा तुझ्या कार्यकर्त्याची इथे चिकार गर्दी आहे..शत्रूलाही लाजवेल अशी ताकद तुझ्या लेकरात आहे..परंतू बाबा खंत मात्र एवढीच आहे..तुझे काही कार्यकर्ते गटातटात आणि तुझे काही लेकर पैसा आणि विद्येच्या अहंकारात भरकटले आहेत…कोणी काँग्रेस मध्ये धसा कोणी बि.जे.पी.त घुसा कोणी शिवसेनेत बसा कोणी म.न.से.त उमटवा आपला ठसा.समाज तुम्हच्याकडे बघून रडतोय ढसाढसा.तरीपण आम्हाला थोडीसीही लाज वाटत नाही.की मी इकडे तिकडे जाऊ कसा.आणि वरुन वर तोंड करून आम्ही समाजात फीरुन स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो की मी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा अणुयायी आहे कसा…..मी बाबासाहेबांचा खरा अणुयायी आहे म्हणून इकडून तिकडे तू फीरत सांगत आहेस.आणि कोणत्या तरी मनुवादी पक्षाचे पद घेऊन चळवळ कुणीकडे चालवित आहे…. चंदनाची सर इतर लाकड करु शकत नाही.आणि स्वाभिमानी माणसाची नकल करुन त्या वाघाची सर आंबेडकरी समाजातील बैमान माकड करु शकत नाही….. बेभान बेधुंद झालो आम्ही त्या राजकारणाच्या पायी..आणि आम्ही स्वतःच आज काय करीत आहोत याचाच आज आम्हाला थांब पत्ता नाही.. उभ्या आयुष्यात आम्ही जरी बाबासाहेब वाचू शकलो नाही.. आणि निवडणूकी मध्ये ऊभे राहण्याची आम्हाला इतकी कशी काय होते घाई.. त्या बाबासाहेबांची चळवळ आम्हीच मोडीत काढली बाई.. आणि त्या बाबासाहेबाची विचार संपत्ती मातीत घालण्याची आम्हीच केली घाई..देशातील इतर लोक आम्हाला म्हणतात हे लोक कधी सुधरणार नाही..आणि अती शिक्षणामुळे यांच्या मधले पुष्कळसे लोक वाया गेले बाई….अगर येवडीच असेल तुम्हच्या मध्ये आंबेडकरी चळवळीची आग.तर त्यासाठी पुष्कळशा लोकांना करावा लागेल राजकारणाचा त्याग.स्टेजवरती महापुरुषांचे पोवाडे गाथा.स्टेजच्या खाली येता न येताच शेण खाता.मनुवादयाची दलाली करुन भाड खाता.शिव फुले शाहू डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेता.व आर.एस.एस.मनुवादी पक्षाचे काम करता.आणि पुन्हा वर तोंड करून समाजामध्ये फीरता.आणि म्हणता की बाबासाहेबांची चळवळ आम्ही समोर घेऊन जाऊ.लाज नाही वाटत का थोडीशी तरी जणाची नाहीतर मनाची आम्हाला हे सगळ करतांनी…तुम्ही सामाजिक कार्य करीत असाल तुम्ही राजकीय कार्य करीत असाल तर तुम्ही सगळ्यांत अगोदर शिलाचे पालन करणारे असले पाहिजे.तुम्ही चारित्र्यवान असले पाहिजे आणि तुम्ही सच्चे आंबेडकरवादी सुद्धा असले पाहिजे.कारण आंबेडकरी समाजाचे व आंबेडकरी युवकांचे भविष्य येणाऱ्या पिढीचे भविष्य हे तुम्हच्या हाती आहे.जर का तुम्ही साफसुथरे नसाल बेविचारी बेअकली आपमतलबी असाल तर कुठून समाजाचा उद्धार करणार आहात.आज तुम्ही प्रलोभनाला बळी पडून कमाविलेला तुम्हचा छोटासा लाभ येणाऱ्या पिढीचे फार मोठे नुकसान करु शकते याचा कधी विचारच आम्ही लोक करतांनी दिसत नाही. ..आजकाल समाजामध्ये प्रत्येक जन वेगवेगळे पक्ष काढतो.कोणी वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षामध्ये काम करतो आणि समाजामध्ये फीरुन बाबासाहेब सांगतो.तर अशावेळी आंबेडकरी ताकद कशी निर्माण होईल.जर का आंबेडकरी ताकदच निर्माण होणार नाही तर मग आम्हाला विचारात कोण घेईल.कारण ते लोक तर म्हणतात की सगळे चालतील परंतू आंबेडकरी लोक चालत नाही.मांतग चालेल चांभार चालेल कुंभार वढार चालेल पण बौद्ध चालत नाही.मग आंबेडकरी ताकद कशी निर्माण होईल याचे उत्तर अगोदर दया.मगच वेगवेगळे पक्ष निर्माण करणाय्रा नेत्यांनो बाबासाहेब आंबेडकर समाजात सांगा…आपण लायक बापाचे नालायक मुले निघालो हे आपण जो पर्यंत स्विकारत नाही.तो तोपर्यत आम्हाला खरा मार्ग सापडणार नाही.ही वेळ नाही आहे स्वतःला मी मी म्हणण्याची मी मी करुन पुढे मिरवण्याची व स्वतःचे वेगवेगळे पक्ष निर्माण करण्याची.या देशातील संविधान वाचविण्यासाठी या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिक्षणाच्या प्रश्नासाठी आपले मुलभूत प्रश्न वाचवण्यासाठी सगळ्यांनीच पुढाकार घेऊन एकमेकांना सहकार्य करुन ही चळवळ पुढे नेऊन ती यशस्वी करुन या देशाला प्रबुद्ध भारत बनवून त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्याची ही वेळ आहे हे आम्ही सगळ्या बौद्ध समाजातील अनुयायांनी लक्षात घ्यायला पाहिजे असे मला वाटते…. संघटित व्हा हा बाबासाहेबांचा आदेश मोडणारे बाबासाहेबाचे अणुयायी कसे काय होऊ शकतात.जे खरोखर समाजाच भल चाहत असेल तर संघटित होऊनच लढाव लागेल हे सगळ्यानी अगोदर समजून घ्यावे.या पलिकडे समाजाला काहीही मान्य नाही.कुणीही फुकटची वेळ वाया घालवू नये.समाज अखेरपर्यंत कोणाला ही अंतकराणात जागा देणार नाही हे तितकेच सत्य आहे हे लक्षात घ्या…या पुढे या अशा आपल्या आंबेडकरी समाजातील नेत्यांच्या वागण्यामुळे व्यक्ती विशेष राजकारण न चालविता सामूहिकरीत्या ते कसे चालविता येईल या वरती आम्हाला विचार करावा लागेल.कारण व्यक्ती विकल्या जाऊ शकतो, व्यक्तीला खरीदल्या जाऊ शकते,व्यक्तीला गोळ्या मारल्या जाऊ शकतात, व्यक्तीला जेहलात टाकल्या जाऊ शकते.व असे जर का घडले तर समाज अनाथ होऊ शकतो.म्हणून बारिशमध्ये ऐकादमाने वाढणाय्रा गवताप्रमाणे काही स्वाभिमानी लोक ऐक प्रमाणात ऐकत्र समोर या.जेणेकरुन आपला दुश्मन सुद्धा भ्रमित झाला पाहिजे की यांचा लिडर कोण आहे….आंबेडकरी ताकद आज विखुरलेल्या अवस्थेत असल्यामुळे तिला भंगाराचे स्वरूप आलेले आहे.म्हणून आज त्या भंगार परिस्थितीत असलेल्या आंबेडकरी ताकदीला कोणीही विचारायला तयार नाही हे आम्हाला अगोदर समजून घ्यावे लागेल.आम्हाला लढायचं असेल जिंकायच असेल या देशाची शासनकर्ती जमात बनायच असेल तर ती ताकद सगळ्यात अगोदर आम्हाला निर्माण करावी लागेल… आज आम्हच्या या अशा वागण्यामुळे लुच्चे लफंगे लुटारु बेईमान बेवारीस क्रीमिनल बलात्कारी दोन नंबर वाले लोक संसदेत गेलेत आणि आम्ही शिकले सवरलेले पदवीधर डिग्री डबल डिग्री एम.ए.डबल एम.ए.वाले लोक त्या राजकारणात घुसू शकलो नाही आणि त्या संसदेमध्ये जाऊन बसू शकलो नाही….डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आपला आदर्श मानून व त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून ईमानदारीने जो व्यक्ती काम करतो.तो माणूस पैसासाठी पदासाठी आपल्या प्रतिष्ठेसाठी आपला आत्मसन्मान कधीही विकणार नाही…परंतू जे लोक बाबासाहेबांच्या नावावरती चळवळीचे ढोंग करुन समाजात वावरतात असे लोक आपला आत्मसन्मान विकून आपले घरदार चालविण्यासाठी समाजाला विकून समाजाला खड्ड्यात घालून पुन्हा बैमानी करण्यासाठी जिवंत राहतील.यालाच कमीशन बेस कार्यकर्ता आपल्याला म्हणता येईल….असा कार्यकर्ता हा मक्कारीने ओतपोत भरलेला असतो.समाज गेला खड्ड्यात आणि विचार गेले चुलीत अशा लोकांना समाजाच्या भल्या बुय्राच काही देण घेण नसत.चंद तुकड्यासाठी हे असे लोक हमेशा स्वतःला विकायला तयार असतात.अशा लोकांनी शरम हया वैगरे विकून खाल्लेली असते.परंतू असे लोक स्वतःला बाबासाहेबाचा सैनिक भीम का बच्चा भीम का लाल साबित करण्यासाठी मोठमोठे बॅनर व्हाॅटसप फेसबुक वरती स्वतःला दरवेळी चमकवीत असतात.व बाबासाहेबांच्या फोटोच्या खाली बसूनच समाजाची निलामी करीत असतात.स्वाभिमानी लोकांना बदनाम करण्यासाठी हे भेडीये हमेशा तयार राहतात.कारण स्वाभिमानी लोकांमुळे यांच्या दुकानदाय्रा बंद कधी होतील यांची यांना जास्त प्रमाणात भीती असते.अशा स्वाभिमानी लोकांची यांच्या छातीत हमेशा दहशत असते.समाजाला गुमराह करण्यात हे लोक तरबेज असतात.म्हणून अशा लोकांना ओळखणे आज अत्यंत गरजेचे आहे.कारण या अशा लोकांनीच समाजाला विकून चळवळ मागे आणलेली आहे…ज्या माणसांने बुद्ध धम्माला व बाबासाहेबांच्या विचारांना खरोखर आत्मसात केले असेल तो माणूस शीलवान गुनवान नितीवान चरित्रवान असतो.तो माणूस कधीही मोहाला व्यक्तीगत स्वार्थाला बळी पडत नाही.म्हणून सगळ्यात अगोदर तथागत गौतम बुद्धाचे व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे अनुयायी बना.व शीलवान गुनवान नितीवान चरित्रवान बनून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करा….संघटित होऊन संघर्ष केल्यानेच ऐकजूट झाल्यानेच आम्ही या देशाची शासनकर्ती जमात बनू शकतो.अन्यायाच्या विरोधात आपला आवाज बुलंद करु शकतो,ताकत निर्माण झाली तर कोणत्याही जुलमी सरकारला आम्ही झुकवू शकतो,दबाव आणून आपल्या मागण्या मान्य करुन घेऊ शकतो.एकएकटे लढल्याने गटातटात लढल्याने या देशाची शासनकर्ती जमात आम्ही बनू शकत नाही आणि समाजाचा सुद्धा उध्दार होऊ शकत नाही.उलट असेच चालू राहिले तर समाजाचे फार मोठे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही हे तितकेच सत्य आहे.ऐक अर्धा आपला माणूस तिकडे गेला तरी ते मनुवादी प्रवृत्तीचे लोक बाबासाहेबांचे स्वप्न सुद्धा पूर्ण करू शकत नाही.त्या लोकांना बाबासाहेबांच्या विचाराचे लोक चालत नाही. तर ते खरोखरच या देशाला बाबासाहेबांच्या विचाराने चालवतील का,प्रबुध्द भारत बनवतील का.जर का या देशाला बाबासाहेबांच्या विचाराने चालवायचे असेल बुध्द धम्माच्या मार्गाने न्यायचे असेल तर या देशात निळ्या झेंड्याचे सरकार आले पाहिजे बाबासाहेबांच्या विचारांचे सरकार आले पाहिजे,महापुरुषांच्या विचारांचे सरकार आले पाहिजे.असे जर का आम्हाला मनापासून वाटत असेल तर.यापुढे आंबेडकरी समाजातील राजकारणात येणाऱ्या पिढीने या त्या पक्षात मनुवादी पक्षात काम करने आता सोडले पाहिजे.जुन्या लोकांनी जे घोडचूक केली आहे त्याचे परिणाम आज समाज भोगत आहे हे लक्षात घेऊन आंबेडकरी समाजातील युवकांनी यापुढे वागायला पाहिजे.घरोघरी नेते पैदा करन आता थांबवील पाहिजे चांगल्या मोजक्याच लोकांनी समाजाचा उद्धार डोळ्यासमोर ठेऊन आता राजकारणात उतरले पाहिजे.असे जर का आम्हच्याकडून होत नसेल तर याचा मतबल हा साफ साफ असा होतो की,आम्ही बाबासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करत आहोत बाबासाहेबांशी गद्दारी करत आहोत हाच त्याचा निष्कर्ष निघतो हे लक्षात घ्या….आंबेडकरी समाजातील पुष्कळसे लोक सत्तेमध्ये जाण्यासाठी काम करीत आहे समाजाचे भले करण्यासाठी काम करीत नाही आहे.समाजाचे भले करण्यासाठी जर का त्यांनी काम केले असते तर त्यांच्यामध्ये त्याग समर्पण बलिदानाची भावना निर्माण झाली असती व त्यांनी समाजाच्या भल्याकरिता आपले पद आपली इच्छा महत्वकांक्षा बाजूला सारून एकमेकांना सहकार्य करणे हे ठरवले असते.परंतु स्वतःचाच विचार करून समाजात काम करत असल्यामुळे या सगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहे….
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत