भारतातून मान्सून चार दिवस उशिराने माघारी.

दक्षिण-पश्चिमी मान्सून १५ ऑक्टोबरच्या तारखेऐवजी चार दिवसानंतर म्हणजे गुरुवारी देशातून पूर्णपणे परतला आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवासही आठ दिवस उशिराने सुरु झाला होता. २५ सप्टेंबरला मान्सूनने परतीचा प्रवास सुरु केला होता. सर्वसाधारणपणे, दक्षिण-पश्चिम मान्सून एक जूनपर्यंत केरळमध्ये धडकतो आणि आठ जुलैपर्यंत संपूर्ण देशात पोहोचतो. असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे
उत्तर पश्चिम भारतामधून १७ सप्टेंबरला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु करतो. १५ ऑक्टोंबरपर्यंत मान्सून पूर्णपणे परततो. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून १९ ऑक्टोंबरपर्यंत संपूर्ण देशातून परत गेला आहे. दक्षिण भारतात पूर्व-उत्तर हवा वाहण्यास सुरवात होऊन दोन ते तीन दिवसात या भागात उत्तर-पूर्व मान्सून पाऊस सुरु होऊ शकतो.
सामान्यपणे, उत्तर-पूर्व मान्सूनचे सुरुवातीचे चरण कमकूवत राहण्याची शक्यता आहे. भारतामध्ये अल निनोचा चांगलाच प्रभाव जाणवला. त्यामुळे चार महिन्यांचा (जून-सप्टेंबर) कालावधीत पाऊस कमी पडला. सरासरी या चार महिन्यांमध्ये ८६८.६ मिमी पाऊस पडतो, पण यंदा ८२० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत