
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी होणार आहे. या शांतता करारामुळे आसाममध्ये अनेक दशकांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येणार आहे. केंद्र सरकार, आसाम सरकार आणि युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम अर्थात उल्फा यांच्यात आज दिल्लीमध्ये त्रिपक्षीय शांतता करारावर स्वाक्षरी होणार आहे. ईशान्येकडच्या भागामध्ये अखंड शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा करार केला जाणार आहे. उल्फा नेते आणि सरकार यांच्याशी अनेक वर्षांच्या वाटाघाटी आणि चर्चेनंतर आज त्रिपक्षीय शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शांतता करारात आसाममधल्या आदिवासींच्या हक्कांचं रक्षण करणाऱ्या तरतुदी असण्याची शक्यता आहे. मात्र आसाम सरकार आणि केंद्र सरकारने अनेक प्रयत्न करूनही उल्फाचा परेश बरुआ गट अद्याप शांतता करारात सहभागी झालेला नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत