नागपूरात स्वाईन फ्ल्यूने 4 जणांचा मृत्यू

शहरातील विविध रुग्णालयांत चौघांचा मृत्यू ‘स्वाईन फ्लू’ने झाल्यावर मृत्यू विश्लेषण समितीने मंगळवारी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
नागपुरातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयात दगावलेल्या रुग्णांमध्ये नागपूर शहरातील २, गोंदिया जिल्ह्यातील १, मध्य प्रदेशातील १ अशा एकूण ४ रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांना गेल्या काही दिवसांमध्ये ‘स्वाईन फ्लू’ची लक्षणे असल्याने उपचारासाठी नातेवाईकांनी विविध रुग्णालयांत दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूंमुळे शहरातील विविध रुग्णालयांत आजपर्यंत दगावलेल्या रुग्णांची संख्या दहावर पोहचली आहे.
‘स्वाईन फ्लू’ हा पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, एकही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावा. धोके टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असलेल्या रुग्णंनी ‘इन्फल्युएंझा ए’ लसीचा डोस घ्यावा. वैयक्तिक स्वच्छता राखावी, हाथ निर्जंतूक करावे, शिंकताना तोडावर रुमाल धरावा. वारंवार स्पर्श होणाऱ्या वस्तू जागा निर्जंतूक करा. ‘फ्ल्यू’ सदृश्य लक्षणे असल्यास घरीच थांबा, गर्दीत जाऊ नका, भरपूर विश्रांती व पाणी घ्या. ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असणाऱ्या व्यक्ती, गर्भवती स्त्रिया, लहान मुले यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सगळ्या शासकीय रुग्णालयांत उपचाराची सोय आहे, अशी माहिती महापालिकेचे साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत