सांगलीत वेल्डरचा मुलगा झाला राज्य कर निरीक्षक

संजयनगर येथील आकाश राजेंद्र वाघमारे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना परिस्थितीवर मात करत आकाशने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेतून राज्य कर निरीक्षक हे पद प्राप्त केले. आई-वडिलांना जणू भेटच मिळाली. त्याचे वडील वेल्डिंगचे काम करत असताना त्यांना कामात मदत करत त्याने केटरिंगचे काम करून शिक्षण घेतले.आकाशचे प्राथमिक शिक्षण महापालिका शाळा क्र. २९, माध्यमिक. व उच्च माध्यमिक शिक्षण सांगली हायस्कूल, तर पदवीचे शिक्षण कस्तुरबाई महाविद्यालयातून झाले. क्रीडा मार्गदर्शक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने खो-खोचा सराव करीत राज्य व राष्ट्रीय स्तरावर पदके मिळवली. रवींद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती करिअर पॉइंट येथे एमपीएससीचा अभ्यास केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत