जोमाने कामाला लागा, शिंदेंच्या खासदारांना सूचना.

शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांची मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावर बैठक पार पडली. शिवसेनेच्या लोकसभेतील 18 खासदारांपैकी अरविंद सावंत, संजय जाधव, राजन विचारे, विनायक राऊत आणि ओमराजे निंबाळकर हे पाच खासदार वगळता इतर सर्व खासदार हे शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटातील 13 खासदारांच्या या बैठकीत दसरा मेळावा, लोकसभा निवडणूक आणि कॅबिनेट विस्तारावर बैठकीत चर्चा झाली आणि निवडणुकीच्या पूर्वी सर्व खासदारांना आपल्या मतदार संघात भव्य सभा घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून मार्गदर्शन करण्यात आलं.
आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांना समोर ठेवत भाजपचं मिशन 45 सुरू केले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा जिंकण्याचं टार्गेट भाजपने ठेवलं आहे. याच मिशनसाठी काही केंद्रीय मंत्र्यांचे दौरे राज्यातील लोकसभा मतदारसंघात पार पडले आहेत. आता भाजपचे प्रमुख नेते विधानसभेच्याही 144 मतदारसंघात दौरे करणार असून निवडणुकीची रणनीती आखणार आहेत. भाजपाच्या मिशन 45 साठी चंद्रशेखर बावनकुळे संयोजक आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत