शिवसेना आणि राष्ट्रवादीतील आमदारांच्या अपात्रेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. दोन्ही पक्ष्यांच्या याचिका संदर्भात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोर सुनावणी.

आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 13 ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडली होती मदार अपात्रता दिरंगाई प्रकरणी ठाकरे गट आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी पार पडली होती. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांवर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. तसेच, अध्यक्षांना कायदा समजत नसेल, तर त्यांच्या बाजूला बसून त्यांना कायदा शिकवा, असं सांगत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं. अध्यक्षांना आज पुन्हा सुनावणीबाबत सविस्तर माहिती कोर्टाला द्यायची आहे. आज अध्यक्षांकडून काय भूमिका मांडली जाते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच, पोरखेळ करताय का? विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगावं की, हे प्रकरण त्यांनी गांभीर्यानं घेण्याची गरज आहे, अशा कडक शब्दांत सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकरांना सुनावलं होतं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत