साताऱ्यात रात्री 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप.

साताऱ्यात सोमवारी रात्री 11:36 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता सौम्य असल्यामुळे या मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रातून या बाबत माहिती दिली आहे. रिश्टर स्केलवर तीव्रता 3.3 मोजली गेली. अचानक आलेल्या या भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराहट पसरली असून लोक घराच्या बाहेर पडले. गेल्या तीन महिन्यात हा भूकंपाचा दुसरा धक्का आहे. या भूकंपामुळे लोकांनी भीतीपोटी संपूर्ण रात्र जागून काढली.
या मुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. रिश्टर स्केलवर तीव्रता 3.3 होती. भूकंपाच्या केंद्र बिंदू कुठे आहे हे अद्याप कळू शकले नाही. या पूर्वी देखील 16 ऑगस्ट रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत