मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

६७ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिना निमित्त ऐतिहासिक बुद्धिस्ट फेस्टिवलचे आयोजन.

मित्र हो, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय कष्ट आणि संघर्ष करून तथागत बुद्धांच्या अहिंसेचा मार्ग स्विकारून कुठेही रक्ताचा थेंब न सांडता जगात धम्मक्रांती उभी केली. 14 ऑक्टोबर १९५६ ला अशोका विजयादशमीच्या दिवशी हिंदूच्या दडपणाखाली असलेला शोषित पिढीत समाज, या समाजाला २२ प्रतिज्ञा देऊन पवित्र बौद्ध धम्माची दिक्षा दिली आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्वाभिमानाने प्रत्येकांना जीवन जगण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. या घटनेला आज ६७ वर्ष पुर्ण होत आहेत, म्हणून तर प्रत्येकांची आज प्रगती झालेली दिसत आहे. पण खंत ही आहे की, आज अनेकजन बाबासाहेबांची चांगली कामे विसरून त्यांच्या विचारांना मूठमाती देऊन पुन्हा अनेक धर्माकडून थोडयाशा अमिषाला बळी पडून दारिद्रयाच्या जोखडात अडकत आहेत. आणि यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या चळवळीला पुढे जाण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या धम्मक्रांतीला आज ६७ वर्ष पूर्ण झाल्याने, पुन्हा पुन्हा धम्मचक्र अनुप्रवर्तनदिन साजरा करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. म्हणून औरंगाबाद शहर, जिल्हा व देश-विदेशातील विद्वान भिक्खू संघाच्या उपस्थितीत रविवार दिनांक २२ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत वाळूज औद्योगिक वसाहती मधील रांजणगाव शें. पू. येथे ऐतिहासिक बुद्धिस्ट फेस्टिवलेचे आयोजन करण्यात आले आहे.

म्हणूनच या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीला प्रामाणिकपणे गतिमान करण्याऱ्या व समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार आणि समाजातील अनेक उत्कृष्ट विद्यार्थी, उपासक उपासिका बौद्ध धम्माचा मंच उपलब्ध नसल्याने आपल्यामध्ये असलेली अनमोल कला दाखवू शकत नाहीत. म्हणून या माध्यमातून त्यांना धम्म स्टेज उपलब्ध करून देणार आहोत. म्हणून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातील महान विद्वान भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर साहेब यांचे महत्त्वाचे मार्गदर्शन सुद्धा यावेळी लाभणार आहे. आणि त्यांच्या हस्ते वरील सर्व सत्कारमूर्तीचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!