डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार दिला :- खारवे

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपूर्ण विश्वाने स्विकारले आहे .
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिताना सर्व नागरीकांना समान अधिकार मिळतील याची काळजी घेतली आहे त्यामुळे संविधान एक दस्तऐवज नव्हे तर तो जीवनशैली आहे कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर जे संविधान लिहीले आहे त्या संविधानात सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार दिला आहे कारण हे संविधान संपूर्ण विश्वाने स्विकारले आहे असे प्रतिपादन समीक्षा मारुती खारवे यांनी नळदुर्ग येथील इंदिरानगर येथे बी. आर. ग्रुपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलतांना केले
दि. १४ एप्रिल रोजी संपुर्ण देशात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नळदुर्ग शहरातही शासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्था, विविध संघटना व संस्थांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
नळदुर्ग शहरातील इंदिरानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बी. आर. ग्रुपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच महात्मा गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. या कार्यक्रमास शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर घोडके, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, उत्तम बनजगोळे, सामाजिक कार्यकर्त्या कल्पना गायकवाड आदिजण उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह महात्मा गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले.
बी. आर. ग्रुपचे प्रमुख मारुती खारवे यांनी प्रास्ताविक करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली.
यावेळी बोलतांना समीक्षा खारवे यांनी म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्व घटकांसाठी कार्य केले आहे. डॉ. बाबासाहेबांनी आयुष्यभर भेदभाव तसेच सामाजिक अन्यायाविरुद्ध संघर्ष उभा केला. शेतकरी कामगार व दिनदलितांसाठी बाबासाहेबांनी कार्य केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा हा मुलमंत्र दिला बाबासाहेबांचे कार्य महान आहे आणि देशासाठी खुप मोठे योगदान ही आहे याचमुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपल्या देशासाह जगातील ६५ देशात साजरी केली जाते असेही समीक्षा खारवे यांनी म्हटले आहे.
यावेळी तानाजी जाधव यांच्यासह लहान मुलींनीही भाषण करुन बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.या कार्यक्रमास महिला, पुरुष, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बी. आर. ग्रुपचे प्रमुख मारुती खारवे यांच्या मार्गदर्शनाखाली बी. आर. ग्रुपचे अध्यक्ष पप्पु मस्के, उपाध्यक्ष रोहीत माने यांच्यासह बी. आर. ग्रुपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत