शनिवारी-रविवारी ठाणे स्थानकात ‘पॉवर ब्लॉक’!

मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात पादचारी पुलावर पाच मीटर रुंद गर्डर टाकण्यासाठी शनिवार-रविवार (ता. १४ आणि १५) मध्यरात्री वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे
हा ब्लॉक मुलुंड ते कळवा डाऊन धीम्या मार्गावर शनिवार रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटण्याऱ्या डाऊन उपनगरीय लोकल मुलुंड आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरून धावतील. तसेच या लोकल ठाणे, कळवा आणि मुंब्रा स्थानकांवर थांबतील.
शनिवारी (ता. १४) रात्री ब्लॉकच्या आधी सीएसएमटीहून टिटवाळ्यासाठी शेवटची लोकल रात्री ११.१६ वाजता असेल. ही लोकल टिटवाळ्याला मध्यरात्री एक वाजता पोहोचेल; तर ब्लॉकनंतर टिटवाळ्यासाठी पहिली लोकल विद्याविहार येथून ५.११ ला सुटेल आणि टिटवाळ्याला ६.२३ वाजता पोहोचेल. त्यानंतरच्या अन्य लोकल वेळापत्रकानुसार धावतील, अशी माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत