ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन.

ज्येष्ठ हिंदी व गुजराती अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन झाले आहे. त्यांनी ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तब्बल ४५ वर्षांपासून अभिनयसृष्टीत कार्यरत भैरवी यांनी आतापर्यंत अनेक हिंदी व गुजराती मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्या मागच्या सहा महिन्यांपासून कॅन्सरशी लढत होत्या. याच दरम्यान ८ ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
भैरवी वैद्य यांनी ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘ताल’, ‘व्हॉट्स योर राशी’, ‘हमराज’, ‘क्या दिल ने कहा’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, भैरवी गेल्या ६ महिन्यांपासून कर्करोगाने ग्रस्त होत्या. प्रतीक गांधीने भैरवी वैद्य यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, “मला त्यांच्याबरोबर ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. आमची चांगली बॉन्डिंग होती. त्या खूप प्रेमळ होता. मी त्यांना लहानपणी स्टेज आणि टेलिव्हिजनवर काम करताना पाहिले होते आणि त्यांच्या कामाचे मला खूप कौतुक वाटायचे. त्यांचा हसरा चेहरा मी कधीच विसरू शकत नाही.”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत