क्रिकेटदेश-विदेशभारतमुख्यपान

अफगाणिस्तानकडून इंग्लंडचा पराभव.

 इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील दोलायमान होत असलेल्या सामन्यात माजी विश्वविजेत्यांना चारीमुंड्या चीत करत अफगाणी खेळाडूंनी ६९ धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला. विश्वचषक २०२३मधील हा पहिला धक्कादायक निकाल आहे. अफगाणिस्तानचा वर्ल्डकप स्पर्धेतला हा केवळ दुसराच विजय आहे. २०१५ वर्ल्डकप स्पर्धेत त्यांनी स्कॉटलंडला नमवलं होतं. इंग्लंडला वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत बांगलादेश विरुद्ध दोनवेळा आयर्लंड, झिम्बाब्वे आणि आता अफगाणिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे.

एकदिवसीय विश्वचषकाच्या १३व्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव करत अफलातून विजय नोंदवला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानचा संघ ४९.५ षटकांत सर्वबाद २८४ धावांवर आटोपला. इंग्लंडसमोर विजयासाठी २८५ धावांचे लक्ष्य होते, परंतु त्यांचा संपूर्ण संघ ४०.३ षटकांत २१५ धावांत सर्वबाद झाला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!