मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

सिलिंडरच्या स्फोटात फुगे विकणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर सात ते आठ बालके गंभीर जखमी

रविवारी सायंकाळी लातूर शहरातील तावरजा कॉलनी भागात ही घटना घडली. मृत फुगेवाला हा एका दुचाकीवर गॅस सिलिंडर घेऊन आलेला होता. त्याच्याजवळ फुगे घेण्यासाठी म्हणून सात ते आठ मुले आलेली होती.

यादरम्यान, अचानक सिलिंडरचा स्फोट होऊन प्रचंड मोठा आवाज झाला. या स्फोटात फुगे विकणारा व्यक्ती जागीच ठार झाला आहे. याची माहिती मिळताच विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुधाकर वावकर आणि त्यांचे दोन पथके घटनास्थळी दाखल झाली. तात्काळ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले आणि त्यामधून जखमी लहान मुलांना लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!