बिल्किस बानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल ठेवला राखून

बिल्कीस बानो सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील ज्या ११ आरोपींना शिक्षेतून माफी देण्यात आली. त्या प्रकरणाची सर्व मूळ कागदपत्रं १६ ऑक्टोबरपर्यंत सुप्रीम कोर्टात सादर करावीत असे निर्देश सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकार आणि गुजरात सरकारला दिले आहेत. तसेच न्या. बीव्ही नागरत्न आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठानं यावरचा निर्णयही राखून ठेवला आहे.
शिक्षा पूर्ण होण्याआधीच दोषींची सुटका करण्याचा निर्णय गुजरात सरकारनं घेतल्यानं त्याविरोधात स्वतः पीडिता बिल्किस बानोसह इतर काही लोकांनी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केल्या आहेत.
यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सुभाषिनी अली, मुक्त पत्रकार रेवती लैल आणि लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरु रुप रेखा वर्मा तसेच तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा समावेश आहे. या याचिकांवर आज न्या. नागरत्न आणि न्या. भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत