‘हे’ सहा शक्तीशाली देश इस्रायलच्या बाजूने.

अमेरिका आणि ब्रिटनने इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. गेल्या सहा दिवसांपासून हे युद्ध सुरू असून या युद्धामुळे जगातील देशांचे दोन गट पडतील असं चित्र दिसू लागलं आहे. इस्रायल आणि हमासमधील युद्धात गेल्या पाच दिवसांत २,००० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. काही देशांनी उघडपणे इस्रायलची बाजू घेतली आहे. तर काही देशांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच हमास या दहशतवादी संघटनेच्या कारवाईचं काहींनी समर्थन केलं आहे. इराणधील हिजबुल्लाह ही दहशतवादी संघटना उघडपणे हमासचं समर्थन करत असून त्यांना शस्त्रास्रांचा पुरवठा करत आहे. तसेच इराणकडून हिजबुल्लाह आणि हमासला छुपा पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे.
पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेने शनिवारी (७ ऑक्टोबर) पहाटे इस्रायलवर शेकडो क्षेपणास्रं डागली आणि युद्धाला तोंड फुटलं. इस्रायलच्या सीमेवर गोळीबार आणि क्षेपणास्रांचा हल्ला झाल्यानंतर इस्रायलच्या सीमेवर अनागोंदी माजली. याच अनागोंदीचा फायदा घेत हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले. इस्रायलमध्ये घुसून दहशतवाद्यांनी इस्रायली नागरिकांची कत्तल सुरू केली. शेकडो लोकांची गोळ्या घालून हत्या केली. तसेच १५० हून अधिक इस्रायली स्त्रियांचं अपहरण केलं. बेसावध असताना इस्रायलवर झालेल्या या हल्ल्याने इस्रायलचे धाबे दणाणले. परंतु, या धक्क्यातून सावरत इस्रायलनेही लगेच गाझा पट्टीवर आणि हमासच्या अड्ड्यांवर क्षेपणास्रं डागली. हमास आणि इस्रायलमध्ये गेल्या सहा दिवसांपासून युद्ध सुरू आहे. यामुळे इस्रायल आणि गाझा पट्टीत मोठी जीवितहानी झाली आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत