नागपुरात काँग्रेस नेत्यांमध्ये तुफान राडा.

नागपूर : विदर्भ काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. पूर्व विदर्भ लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत काँग्रेसमधील दोन गट एकमेकांना चांगलेच भिडले. बैठक सुरू झाल्यावर काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे भाषण संपवत असताना काँग्रेसचे पदाधिकारी नरेंद्र जिचकार यांच्यासोबत बाचाबाची झाली. यानंतर दोन्ही बाजूकडील समर्थक आपआपसात भिडले. यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली आणि कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावरही धावून गेले
काँग्रेस कार्यकर्त्यांत झालेल्या राड्यावेळी मंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्यासह काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार स्थानिक नेते उपस्थित होते.
दरम्यान, नागपूर शहर काँग्रेसमध्ये आधीपासूनच दोन गटांमध्ये पक्ष विभागला गेला आहे. माजी खासदार विलास मुत्तेमवार आणि दुसरा राऊत-चतुर्वेदी गट आहे. काँग्रेसमधील हा अंतर्गत वाद आज पुन्हा एकदा या निमित्ताने चव्हाट्यावर आला. मात्र या प्रकारची कुठलीही बाचाबाची किंवा धक्काबुक्की झाली नसून कार्यकर्त्यांतील जोश या निमित्ताने दिसून आल्याचे काँग्रेस पदाधिकारी व नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र यावेळी पत्रकारांनाही चित्रीकरणापासून रोखण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत