
वर्ल्डकप 2023 च्या नवव्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत 272 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने अवघ्या 35 षटकांत केवळ 2 गडी गमावून हे लक्ष्य पार केले. या सामन्याचा हिरो ठरला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, ज्याने आपल्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला.
273 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाला फ्लाईंग स्टार्ट दिली. त्याचवेळी त्याला दुसऱ्या टोकाकडून इशान किशनची चांगली साथ मिळाली. रोहितने या सामन्यात केवळ 84 चेंडूत 130 धावांची खेळी केली. रोहितच्या बॅटमधून 16 चौकार आणि 5 षटकार आले. त्याच्यासोबत सलामीला आलेल्या ईशानने 47 चेंडूत 47 धावा केल्या. यानंतर विराट कोहलीने नाबाद 55 आणि श्रेयस अय्यरने नाबाद 25 धावा करत संघाला विजयापर्यंत नेले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत