‘पीएफआय’वर ‘एनआयए’चे छापे; देशभरातील २० ठिकाणी कारवाई.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संबंधित प्रकरणांमध्ये राष्ट्रीय तपास पथकाने बुधवारी मुंबई, ठाण्यासह देशभरातील २० ठिकाणी छापे घातले. महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यात, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये ‘एनआयए’ने कारवाई केली. विक्रोळीतील अब्दुल वाहिद शेख याच्या घरी ‘एनआयए’ने पहाटे छापा घातला. शेख एक संस्था चालवतो. त्याचा ‘पीएफआय’शी संबंध असल्याचा संशय आहे. शेखने घराचा दरवाजा न उघडल्यामुळे ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांना सहा तास घराबाहेरच प्रतीक्षा करावी लागली. अखेर ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी शेखच्या घरात दाखल होऊन चौकशी केली. यावेळी स्थानिक पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ११ जुलै २००६ ला मुंबईतील लोकलमध्ये सात साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात १८७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. अनेकजण जखमी झाले होते. दुसरा छापा ठाण्यातील राबोडी परिसरात टाकण्यात आला. सिमी या प्रतिबंधित संघटनेच्या माजी सदस्याच्या घरी हा छापा टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी एनआयएने संशयिताच्या घरी शोध मोहीम राबवली. त्याला ‘एनआयए’च्या लखनऊ येथील कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. आपला ‘पीएफआय’ संघटनेशी कोणताही संबंध नसल्याचे त्याने चौकशीत सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत