भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामुहीक महा बुध्द वंदना अभिवादन कार्यक्रम लातूर २०२३.


भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामुहीक महा बुध्द वंदना अभिवादन कार्यक्रम लातूर २०२३
भारताचा कोहीनुर हीरा,भारतरत्न च नव्हे तर विश्वरत्न,स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री,बहुजनांचे कैवारी,भारतीय संविधानाचे शिल्पकार,आपले मुक्तीदाते,महामानव,परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ०६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले होते.हे महापरिनिर्वाण म्हणजे बहुजनांचे “प्राणवायु” निघून जाणेच होय.त्यामुळे त्या महापरिनिर्वाण घटनेस ६७ वर्ष पुर्ण होत आहेत.तेव्हा समस्त लातूर करांच्या वतीने सामुदायिक पणे अभिवादन कार्यक्रम महाबुध्द वंदने द्वारे करण्यात येणार आहे.
सर्व लातुरकरांनी स्वतः व आपल्या कुंटुंबासहीत दि.०६ डिसेंबर २०२३ रोजी बुधवार सकाळी ठीक ०७ :३० वाजता,डॉ.बाबासाहेब पार्क लातूर याठिकाणी पांढरे शुभ्र वस्र परिधान करुन महाबुध्द वंदना कार्यक्रमास उपस्थित रहावे ही विनंती.
सोबत येताना एका विध्यार्थ्या करीता पेन – वही सोबत आणावी. ( समाजातील गरजुवंत विध्यार्थांना पेन,वही चे वाटप करण्यात येणार आहे)
कार्यक्रमास सर्वोत्परी मदत करावी.
टिप :
१) सर्व समाज बांधवांनी आपआपल्या परिसरात,नगरात,चौकात,बुध्द विहारात,सभागृहात महाबुध्द वंदने नंतर अभिवादन कार्यक्रम सकाळी १०.०० नंतर आयोजीत करावेत.
२) महाबुध्द वंदना कार्यक्रम संपल्यानंतर पानगाव चैत्य स्मारकास जाणाऱ्यांनी दुपार नंतर जावे..
३) महाबुध्द वंदना यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने “आपले कुंटुंब आपली जबाबदारी” याप्रमाणे कुंटुंबासहीत उपस्थित रहावे.घरी कुणीही थांबू नये.
४) कर्मचारी वर्गाने Working Day बुधवार जरी असला तरी देखील सकाळी लवकर कार्यक्रम attend करून आपल्या कर्तव्यावर जावे.ही विनंती आहे.
५) सर्वांनी या सामाजिक कार्यक्रमाचे स्वतःहून प्रचारक व्हावे.विशेषतः तरुण युवा वर्गाने पुढे येऊन facebook, Reel, whats app status, text msg,स्वतः चे तयार करावेत.
६) शहरात केवळ बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे इच्छुकांनी आपले photo न टाकता केवळ नाव टाकुन बँनर्स लावावेत. ही विनंती आहे.
मार्गदर्शक
भिक्खु पय्यानंद थेरो
संयोजक:
सामूहिक महा बुध्द वंदना अभिवादन कार्यक्रम सुकाणु समिती लातूर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत