कायदे विषयकमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

सायबर गुन्हे नागरिकांची गंभीर समस्या

अनिल वैद्य

सायबर गुन्ह्यांच्या सुळसुळाट झाला आहे.फेक फेसबुक अकाऊंट तयार करणे, बनावट ई मेल पाठवून ब्लॅक मेल करने,आर्थिक लाभाचे आश्वासन देवून फसवणूक करने.
वाटसप , फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी माध्यमात
तुमच्या पोस्ट अर्थात लेखनाला खोडताड करणे.चक्क लेखकाचे नाव काढून स्वतःचे नाव
लेखक म्हणून दाखल करने हे तर सर्रास सुरू आहे.
दिनांक २३ जुलै २०२४ च्या रात्री पासून माझ्या फेसबुक व व्हाटसॲप मित्रांनी मला कळविले की, माझ्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट केले आहे व बनावट अकाऊंट करणारी व्यक्ती माझ्या परिचयाच्या लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवित आहे. त्यांनी मला फेक अकाउंट ची लिंक पाठविली. मी लगेचच फेसबुकला ई-मेल वरुन तक्रार केली. फेसबुकने तक्रारीची नोंद घेऊ व योग्य ती कारवाई करु, असा मॅसेज लवकरच पाठविला. नंतर परत दुसरा मॅसेज पाठविला की, आपली तक्रार सामाजिक तत्वाविरुध्द नाही.
मला नवलच वाटले!परत मी फेसबुकला तिन वेळा तक्रार केली आणि तिनही वेळा फेसबुकने सारखेच फॉर्मट मध्ये उत्तर दिले. यावरुन फेसबुक दखल घेत नाही व फेक अकाऊंट बंद करीत नाही याची मला खात्री झाली.
दरम्यान अनेक चाहत्यांनी फेक अकाऊंटवाल्यांच्या मेसेजचे स्क्रीनशॉट मला पाठविले. ठाण्याचे कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी सुद्धा स्वतः फेसबुकला तक्रार केली. त्याचा स्क्रीन शॉट मला पाठविला.
माझे बनावट फेसबुक अकाऊट तयार करणाऱ्या व्यक्तींचा हेतू माझ्या नावाने मित्र जोडून आर्थिक फसवेगिरी करणे हा होता.त्याने आधी अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.काहींनी स्वीकारली सुद्धा.
मला मित्रांनी पाठविलेल्या सर्व स्क्रिन शॉटमध्ये फेक अकाऊंट वाल्याचा संवाद होता तो असा ,’त्याचा एक मित्र सुमित कुमार हे सी.आर.पी.एफ. मध्ये आहेत, त्यांची बदली झाली. त्यांना घरचे फर्निचर विकायचे आहे. त्यासाठी मोबाईल नंबर दयावा व सुमित कुमारशी संपर्क साधावा’ असा सारखाच मेसेज जणू काही मी पाठवितो असे दाखवून सर्वांना येत होता. मला ओळखणाऱ्यांना माझा स्वभाव व व्यक्तीमत्व माहित असल्याने त्यांनी म्हटले की, अनिल वैद्य साहेब हे असले फर्निचर विकायचे काम करणारे व्यक्तिमत्व नाही, ते लेखक आहेत.कार्यकर्ते आहेत त्यांचे कार्य वेगळे आहे. ज्यांना ज्यांना त्या व्यक्तीने मेसेज पाठविले त्यांनी कुणी त्याला फर्निचर साठी प्रतिसाद दिला नाही. म्हणून ते फसले नाही.
लगेचच सर्वांना सतर्क केले.मी माझ्या फेसबुक अकाऊंटवर व सर्व माझ्या मोबाईल मधे उपलब्ध असलेल्या ४०० ते५०० वाटसप गृपवर सदस्यांना फेक अकाउंट बाबत
सूचना दिली.

२३ जुलै २०२४ ला सूचना देवूनही
फेसबुक कंपनी
फेसबुकचे माझ्या नावाचे फोटोंसह असलेले फेक बंद करीत नसल्याने मी पोलीसांना फोन केला. नाशिक पोलीसांच्या सायबर सेलने मोबाईल घेऊन व्यक्तीशः येऊन तक्रार करण्याचे सुचविले. त्या प्रमाणे दिनांक २५ जुलै २०२४ ला नाशिक सायबर क्राईम विभागात गेलो. विभागप्रमुख रियाज शेख साहेब फार अदबशीर व्यक्ती आहेत, त्यांनी आधी माझे समुपदेशन केले , मला सांगितले की, समाजातील अनेक प्रसिध्द व प्रतिष्ठित लोकांचे फेक अकाऊंट तयार करुन त्यांच्या नावाने पैसे उकळल्या जात आहे. काही प्रसिद्ध सनदी अधिकाऱ्यांचे फेक फेसबुक अकाऊंट केल्याचे उदाहरण म्हणून माहिती दिली. त्या मुळे माझ्या सारखे अनेक प्रसिद्ध व्यक्तीमत्व पीडित
आहेत हे कळले.
त्यांनी माझी तक्रार लिहून घेतली. त्यानंतर त्या व्यक्तीने कुणाशी संपर्क केल्याची तक्रार आली नाही.
परंतु माझ्या नावाने केलेले बनावट फेसबुक अकाऊंट मात्र बंद झाले नाही.(त्यात त्या व्यक्तीने बर्थ डे विडियो टाकले आहेत) म्हणून दोन दिवसांनी म्हणजे २७ जुलै २०२४ रोजी मी भारत सरकारच्या सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार केली. हा लेख लिहित असे पर्यंत तरी ते फेक फेसबुक खाते बंद झाले नाही.
सतत तक्रार करून ही फेक फेसबुक अकाऊंट बंद होत झाले नाही
मी २३ जुलै २४ जुलै २०२४ ला फेसबुकला तक्रार केली, दिनांक २५ जुलै२०२४ ला नाशिक सायबर क्राईम विभागाला तक्रार दिली.दिनांक २७ जुलै २०२४ ला भारत सरकार सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदविली तक्रार तक्रार न २१९०७२४००७४०६२परंतु हा लेख लिहत असे पर्यंत माझ्या नावाने असलेले बनावट खाते बंद झाले नाही. त्या मुळे माझ्या मनात आपल्या देशातील कायदा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण होवू लागले.
फेसबुक अकाऊंट हा गुन्हा तत्काळ बंद करण्यात मला व यश आले नाही.
तुमच्या डोळ्यांनी तुमच्या विरुद्ध हा गुन्हा बघता व काहीच करू शकत नाही!या गोष्टी मुळे निष्काळजी फेसबुक विरुद्ध चीड निर्माण होते .
फेसबुक कंपनी मुळीही दखल घेत नाही.
फेसबुक निष्काळजी आहे.फेसबुक प्रमुख झुकरबर्ग ला सुध्दा मी पोस्ट टाकली. पण फेसबुक तत्काळ कारवाई करीत नाही हा वाईट अनुभव आहे. सायबर गुन्हयांना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य व केंद्र सरकारची पोलीस यंत्रणा काम करीत आहे. *१९३० या मोबाईल क्रमांकावर तक्रार केल्यास प्रतिसाद दिल्या जातो. सायबर गुन्हयांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस विभागाकडून केल्या जातो. त्यासाठी (ए.आय.) बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाचाही वापर केला जातो.
कुठे तक्रार करावी याची सर्व माहिती
गुगल मधे उपलब्ध आहे.
बनावट फेसबुक अकाऊंट वरुन मित्र जोडून त्यांच्याशी खरेदी विक्रीचे बनावट व्यवहार करुन लुबाडणूक करण्याचे प्रकार जागतिक पातळीवर आहेत. त्यात भारताचा १० वा क्रमांक आहे असे कळते .काही प्रकारांची मिळालेली माहिती अशी की, नामांकित व्यक्तीचे बनावट अकाऊंट करून मित्र जोडून मे संवाद साधला जातो. त्यानुसार आर्मी ऑफिसर, सी.आर.पी.एफ. ऑफिसर यांची बदली झाली आहे आणि त्यामुळे त्यांच्या घरचे फर्निचर व इतर सामान कमी किंमतीमध्ये विकायचे आहे, अशी बतावणी केली जाते. त्याचे फोटो पाठविले जातात.
गरजू किंवा स्वस्त मिळते म्हणून मोहात पडलेली व्यक्ती सामान खरेदी करण्याची तयारी दर्शवितो. त्याला मोबाईलद्वारे पैसे पाठविण्याचे सांगतात .नंतर ना फर्निचर मिळत ना ती व्यक्ती मिळून येत.अशा रीतीने लुबाडतात. कधी कधी कार, मोटार सायकल इत्यादी वस्तू विकायचा बहाणा करुन हा फसवणुकीचा प्रकार करतात.
दुसरा एक प्रकार म्हणजे तुमच्या खात्यात पैसे पाठविल्याचा बनावट मेसेज देतात. नंतर चुकून आपल्या खात्यात पैसे गेले परत करावे, असा फोन करुन पैसे परत मागतात. खरोखर पैसे पाठविले
असल्याचे भासवितात. त्या बाबत बनावट पोच पाठवितात.हे बघून साधा भोळा माणूस माणुसकी म्हणून पैसे परत करतो परंतु त्याच्या खात्यात पैसेच आलेले नसतात.अशा रीतीने चांगल्या स्वभावाच्या लोकांची फसवणूक केली जात आहे.हे नित्याचेच झाले आहे.दुसरा प्रकार
समाज माध्यमातून बनावट लोक पार्टटाईम नोकरीचे आमिष देतात, व्यवसायाचे आमिष देऊन फॉर्म भरून वयक्तिक माहिती घेतात.आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, बँक अकाऊंट नंबर, ई – मेल आय डी इत्यादी मागतात आणि बँकेतून पैसे लंपास करतात, असे आजपर्यंत अनेक प्रकार घडले. सायबर गुन्हेगारी आकडेवारी अशी
२०२० मध्ये ४,५२,४१४ तक्रारी, २०२१ मध्ये ९,६६,७९० तक्रारी, २०२२ मध्ये १५,५६,२१८ तक्रारी आणि २०२४ मध्ये एकूण ७,४०,९५७ सायबर गुन्हयाच्या तक्रारी देशभरातुन नोंदविल्या जात आहेत. यातुन अनेकांचे कोटयावधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याशिवाय मानसिक त्रास होतो . ही देशापुढील गंभीर समस्या बनली आहे.
विशेष म्हणजे यातील फसवणुकीचे पैसे अनेकदा मिळत नाहीत. आरोपीचा शोध घेवून त्यांना पकडणे कठीण असते.फेक फेसबुक अकाऊंट तयार करणारा तत्काळ पकडल्या जात नाही हा तर माझा स्वतःचा अनुभव आहे.
ही देशात दहशत निर्माण करणारी गुन्हेगारी आहे.सरकार सीमेवर अतिरेक्यांना पकडू शकते ,गोळी घालून मारू शकते पण या सायबर गुन्हेगारांचां नायनाट करू शकत नाही. त्यांना पकडणे सुध्दा कठीण झाले आहे.
पोलीसखाते प्रयत्न करते. हे खरे आहे! पण या प्रकाराला आळा बसला नाही. अशा गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कृती आराखडा व कार्यक्रम गरजेचा आहे.भारत सरकार व राज्य शासनाच्या गृह विभागाने अधिक सक्षम होणे गरजेचे आहे.
नाशिक विभाग प्रमुख रियाज शेख आणि त्यांचे सहकारी तर महाविद्यालयात जावून लोकशिक्षण देतात.सतर्क राहण्यासाठी धडे देतात.हे त्यांची सामाजिक जाणीव प्रशंसनीय आहे.
देशातील
प्रत्येक नागरिकांने सतर्क राहावे,आपली ओळखपत्रे सहजा सहजी कुणाला देवू नये .कधी कधी बेमालूमपणे कुणाला ओळख पत्रे देतो. खाजगी कंपनीचे
क्रेडिट कार्ड, काढणाऱ्या कंपन्यांचे एजेंट सर्व माहिती घेऊन जातो. ऑनलाईन आर्थिक व्यवहार करतांना परिचित व्यक्तीशिवाय किंवा विश्वासू कंपनी शिवाय इतरांना ओ.टी.पी., खाते माहिती, आधाऱ नंबर, पॅन नंबर देऊ नये.
कुणी चूकुन आपल्या खात्यात पैसे आल्याचे सांगितले तर ती व्यक्ती अति परिचीत असल्याशिवाय त्याला पैसे परत करू नये. ऑनलाईन सायबर गुन्हयाचे वेगवेगळे रुप समोर येत आहे.गुगलवर भारत सरकारच्या गृह विभागाचे सायबर क्राईम पोर्टल आहे त्यावर तक्रार करता येते परंतु फेक अकाऊंट तातडीने बंद केले जात नाही. हा वयक्तिक अनुभव आहे.म्हणजे या देशात असे गुन्हे करणाऱ्यांना मोकळेरान आहे.
ही मुक्त सायबर गुंडगिरी चालू आहे. राज्याचे व देशाचे गृह मंत्री यांनी या गंभीर प्रश्ना कडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.
नागरिकांनी या गुन्हयांच्या जाळ्यात सापडणार नाही, यासाठी दक्ष राहणे गरजेचे आहे.
या साठी के.वाय.सी. कोणालाही देऊ नये, फेसबुकचे प्रोफाईल लॉक करुन ठेवले पाहिज, फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारतांना फार जपून स्विकारावे. व्हाटसॲप ग्रुप करुन मैत्री वाढवून आर्थिक लुबाडणूक करण्याचेही प्रकार घडत आहेत. सामुहिक व्यापाराचे स्वप्न देऊन पैसे गोळा करतात व लंपास करतात.
महिलांच्या बाबत मैत्रीतून ब्लॅक मेलिंग करणे हा सायबर गुन्हयांचा प्रकार आहे.
माहिती तंत्रज्ञान कायदयाच्या कलम ६६ (डी) नुसार बनावट फेसबुक खाते तयार करणे हा गुन्हा आहे.त्या साठी तीन वर्षाची शिक्षा आहे. सायबर गुन्ह्यांला शिक्षेची तरतूद आहे परंतु गुन्हेगार सापडत नाही हीच मूळ समस्या आहे.
गुन्हेगार हा शिक्षेपर्यंत गेला पाहिजे, याची जबाबदारी पोलीस व सरकारची आहे. केवळ फेक अकाऊंट बंद केले
किंवा गेलेले पैसे परत मिळवून दिले म्हणजे न्याय होत नाही तर फेक अकाऊंट करणाऱ्याला पकडून तुरुंगात डांबले पाहिजे तेव्हा खरा न्याय होईल.इतरांना धडा मिळेल. इंस्टाग्रामवर सुध्दा फेक अकाऊंट करुन फसवणुक केली जाते.
या बाबत खबरदारी म्हणून सरकारला काही सूचना अशी,
फेसबुक अकाऊंट काढणाऱ्या व्यक्तीची मोबाईल नंबर सह माहिती सर्वांसाठी अकाउंट वर उपल्ब्ध असावी.या शिवाय खाते सुरू ठेवू नये. मोबाईल सिम घेतांना आधारकार्ड
हाताचे ठसे द्यावे लागतात.असेच पुरावे असल्याशिवाय फेसबुक अकाऊंट किंवा अन्य माध्यमातून अकाऊंट उघडता येणार नाही अशी तरतूद करण्यात यावी.कोण व्यक्ती कोणत्या समाज माध्यमाचा सदस्य
आहे ही माहिती
पोलिसांना दिली
जावी. एखादी
असे पोर्टल असावे की तेथे ऑनलाईन माहिती नोंद व्हावी
माहिती न देणे हा गुन्हा असावा .
जेणे करून
गुन्हेगार पकडता येईल.या कडे लगेचच लक्ष दिले नाही तर ही सायबर गुन्हेगारी हाताबाहेर जाईल.
काही ठिकाणी गुन्हेगारी अड्डे असल्याचे कळते.
झारखंड राज्यात जामताडा या गावात सायबर गुन्हेगार मोठ्या संख्येने असल्याचे सांगतात. तेथील काही आरोपींना तुरुंगाची शिक्षा सुध्दा झाली . हरियाणा राज्यातील . भरतपूर व मेवाड .
उत्तरप्रदेश मथुरा आणि बेंगलुरू येथे
मोठ्या प्रमाणात गुन्हेगार असतात असे कळते.
पोलिसांकडून आज पर्यंत ३ लाख सिम कार्ड ब्लॉक करण्यात आले.
नुकताच बनावट
सरकारी ईमेल
हा प्रकार घडला. सरकारी कार्यालया सारखा नागरिकांना बनावट ई मेल पाठवून आपण पोर्न फिल्म बघता असे कळवून पैसे लाटण्यासाठी ब्लॅकमेल केल्याचे प्रकार झाले.
महिलांबाबत असलेले सायबर गुन्हे म्हणजे
ई-मेलद्वारे होणारा छळ
सायबर स्टॉकिंग पाठलाग .
सायबर पोर्नोग्राफी (सायबर अश्लिलता),
सायबर बदनामी
मॉर्फिंग, संगणकाच्या माध्यमातून इंटरनेटवरील मजकूरामध्ये किंवा छायाचित्रांमध्ये फेरफार करणे
ई-मेल स्फुफिंग ईमेलद्वारे होणारे विडंबन किंवा बदनामी असे विविध विकृत स्वरूप गुन्हेगारांनी
धारण केले आहे व ते तातडीने बंद करण्याची उपाय योजना व्हावी.नाहक बदनामी मुळे कित्तेक मुलींनी आत्महत्या केल्या आहेत.
निर्भयपणे जीवन जगणे मुश्किल होत आहे. देशातून या गुन्हयांचा समुळ नायनाट व्हावा यासाठी सरकारने प्रभावी योजना आखावी कारण देशापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. तंत्रज्ञान विकसित झाले असताना गुन्हेगार तातडीने सापडत नाही व फेक खाते बंद होत नाही.याचेच आश्चर्य वाटते.ही समस्या यंत्रणेच्या इच्छाशक्तीची आहे.गृह विभागाने ठरविले तर एका आठवड्यात हा प्रकार बंद होवू शकतो असे तंत्रज्ञान जाणकार सांगतात.
सरकारने कठोर भूमिका घेतली तर कुणी बनावट अकाऊंट तयार करणारच नाही .सरकारने मोबाईल ,फेसबुक व इंस्टाग्राम ,एक्स या सर्व कंपन्यांना ठणकावून सांगितले पाहिजे की ,योग्य ओळख असल्या शिवाय कोणतीही सेवा पुरविता येणार नाही.एका बाजूने हा नियम तर दुसरीकडे आरोपीचे अटक सत्र असे धोरण अवलंबिले तरच ही किड नियंत्रनात येईल.

अनिल वैद्य
दिनांक २७ जुलै २०२४

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!