देश-विदेशमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

भूकंपाने अफगाणिस्तान पुन्हा हादरलं; आज सकाळी रिश्टर स्केलवर 6.1 तिव्रता

काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तान झालेल्या भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोक बेघर झाले आहेत. मात्र अफगाणिस्तान येथील भय मात्र अजूनही संपलेलं नाहीये. या विनाशकारी भूकंपानंतर आज सकाळी 06:11 वाजता पुन्हा अफगाणिस्तानला भूकंपाचे हादरे बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी असून नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने याबद्दलची माहिती दिली आहे.

शनिवारी दुपारी आलेल्या भूकंपाने अफगाणिस्तानात मोठं नुकसान केलं आहे. तालिबानकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार. पश्चिम अफगाणिस्तानात आलेल्या या भूकंपात चार हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 9 हजार लोक जखमी झाले आहेत, यासोबतच 1,300 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे.अफगाणिस्तानात आलेले हे विनाशकारी भूकंप गेल्या दोन दशकांत अफगाणिस्तानमध्ये आलेला सर्वात प्राणघातक भूकंप ठरला आहे, ज्यामुळे देशासमोरील आव्हाने आणखी वाढली आहेत. दरम्यान या भूकंपानंतर चीनने रविवरी अफगान रेड क्रिसेंट यांना मदतकर्यासाठी 2000,000 अमेरिकन डॉलर इतकी भरघोस मदत केली आहे.

यापूर्वी आपत्ती प्राधिकरणाचे प्रवक्ते मोहम्मद अब्दुल्ला जान यांनी सांगितले होते की, हेरात प्रांतातील झेंडा जान जिल्ह्यातली चार गावांना भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र हेरात शहरापासून 40 किलोमीटर उत्तर पश्चिमेस होतं. यानंतर तीन मोठे हादरे बसले, ज्यांची तीव्रता 6.3,5.9 आणि 5.5 इतकी नोंदवली हेली. यासोबत कमी तिव्रतेचे धक्के देखील बसले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!