
हवामान बदलले की, स्थलांतरित पक्ष्यांचे येणे-जाणे सामान्य आहे. विरुद्ध दिशेला वाहणारा वारा, धुके, पाऊस, प्रदूषण आदी अनेक गोष्टी पक्ष्यांसाठी कधी कधी खूप आव्हानात्मक ठरतात आणि अशा कारणांमुळे मोठ्या संख्येने पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. आज सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. अमेरिकेतील शिकागोमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शिकागोच्या रहिवाशांना एकाच वेळी १००० पक्ष्यांचे मृतदेह रस्त्यावर आढळले आहेत. तसेच पारदर्शक काचेच्या इमारतीला धडकल्याने या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
प्रकरण असे आहे की, गेल्या आठवड्यात ५ व ६ ऑक्टोबरला शिकागोमध्ये अनेक पक्षी आढळून आले होते. पण, दुसऱ्याच दिवशी रस्त्यावर १००० पक्षी मृतावस्थेत दिसले; जे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. या मृतावस्थेतील पक्ष्यांमध्ये अनेक प्रजातींचे पक्षी होते. तसेच एवढ्या संख्येने मृतावस्थेत सापडलेल्या पक्ष्यांना पाहून, एकाच वेळी एवढ्या पक्ष्यांनी आपले प्राण गमावले कसे, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होऊ लागला. पण, यामागचे कारण असे आहे की, एका उंच काचेच्या इमारतीला आदळून जखमी झाल्यानंतर पक्षी जमिनीवर पडले; ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत