
यूपीएससी अंतर्गत निवड होणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस प्रीलिम्स परीक्षा २०२४ आणि आयएफएस परीक्षा २६ मे २०२४ रोजी असेल. यूपीएससी परीक्षेसाठी तयारी करणारे विद्यार्थी आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर upsc.gov.in विविध परीक्षांची तारीख चेक करू शकतात.
परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च असणार आहे. सिव्हिल सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर २०२४ मध्ये असेल. यूपीएससीने परीक्षेसाठी १३ जानेवारी, २४ फेब्रुवारी, ९ मार्च, ६ जुलै, १० ऑगस्ट, १९ ऑक्टोबर, २१ नोव्हेंबर या तारखा राखीव ठेवल्या आहेत. एखादी परीक्षा रद्द झाल्यास या राखीव तारखांमध्ये परीक्षा घेतली जाईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत