प.महाराष्ट्रमुख्यपान

पीएमपीच्या ताफ्यात येणार आणखी ३०० गाड्या

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांच्या सोईसाठी सीएनजीवर धावणाऱ्या १०० गाड्या घेण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे. त्याचबरोबर २०० गाड्या भाडेकराराने घेण्यात येणार असून, त्याबाबतची प्रक्रिया पीएमपी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. पीएमपीच्या ताफ्यात नव्याने गाड्या येणार असल्याने प्रवाशांनाही विविध मार्गांवर गाड्या उपलब्ध होणार आहेत.

प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे ५० गाड्या असणे आवश्यक आहे. पीएमपीच्या ताफ्यात दोन हजार १४२ गाड्या असून, त्यांपैकी एक हजार ४०० गाड्या दैनंदिन संचलनात असतात. त्यामुळे एक लाख लोकसंख्येसाठी ५० गाड्या ही मागणी पूर्ण करण्यासाठी तीन हजार ५०० गाड्यांची आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन पीएमपीच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्वमालकीबरोबरच भाडेकराराने गाड्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गाड्या खरेदीची प्रक्रिया पीएमपी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून, येत्या काही दिवसांत पीएमपीच्या ताफ्यात या गाड्या उपलब्ध होतील, अशी माहिती सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी दिली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!