महापालिका कर्मचाऱ्यांची दसऱ्यापूर्वीच दिवाळी; ८.३३ टक्के बोनस जाहीर.

महापालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षण मंडळाकडील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणारा दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. महापालिकेच्या वित्त आणि लेखा विभागाने कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याच्या दृष्टीने पूर्तता करण्याची सूचना खातेप्रमुखांना केली आहे. बक्षिसाच्या रकमेची घोषणा दसऱ्यापूर्वीच झाल्याने कर्मचाऱ्यांकडूनही समाधान व्यक्त होत आहे.
महापालिकेची मुख्य इमारत, क्षेत्रीय कार्यालय आणि परिमंडळ मिळून एकूण ११ हजार कर्मचारी वर्ग आहे. या कर्मचारी वर्गाला महापालिकेकडून दर वर्षी बोनस (सानुग्रह अनुदान) दिला जातो. दर वर्षी दिवाळीच्या तोंडावर ही प्रक्रिया राबविली जाते. या वेळी मात्र महिनाभर आधीच महापालिकेकडून खातेप्रमुखांना नियमांची पूर्तता करण्याची सूचना करण्यात आली आहे. वित्त आणि लेखा अधिकारी उल्का कळसकर यांनी तसे लेखी आदेश खातेप्रमुखांना दिले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत