
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू परवा २२ तारखेला १९ विशेष मुलांना हे पुरस्कार प्रदान करतील. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार काल जाहीर झाले. ५ ते १८ वयोगटातले नऊ मुलं आणि १० मुलींचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या आदित्य ब्राह्मणे याला शौर्यासाठी हा पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २३ तारखेला राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत. कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, समाजसेवा आणि क्रीडा या प्रकारात असामान्य कामगिरी करणाऱ्या मुलांना हा पुरस्कार दिला जातो.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत