बौद्ध समाजाची प्रगती धम्मक्रांतीमुळे !
- प्रा. आनंद देवडेकर

कणकवली दि. २८ जानेवारी :
बौद्ध समाजाची आज सर्वच क्षेत्रात दिसणारी प्रगती ही केवळ आरक्षणातून झाली नसून बौद्ध धम्माच्या स्वीकारामुळेच ती झाली आहे, असे सुस्पष्ट प्रतिपादन सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर यांनी कणकवली येथील दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतीत क
‘धम्मक्रांतीच्या परिप्रेक्ष्यातील वाटचाल ‘ या विषयावरील परिसंवादातील अध्यक्षीय भाषणात आपले परखड मत नोंदविताना अनेक ऐतिहासिक दाखल्यांचे संदर्भ देत प्रा. देवडेकर पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धम्मात साहित्यिक विचारवंत आणि राजकारण्यांनी ‘ दलित ‘ ‘बहुजन ‘ ‘आंबेडकरी समाज ‘ इत्यादी संकल्पनांचा घोळ घातल्याने बौद्ध समाजाची ‘बौद्ध’ म्हणून आयडेंटिटी तयार होण्यात अडचणी निर्माण झाल्या. बौद्ध समाजात आलेल्या परिवर्तनामागे बौद्ध धम्माचा स्वीकार हे खरे कारण आहे. हे इतर वंचित समाज घटकांना पटविण्यात आपण यशस्वी झालो असतो तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या प्रबुद्ध भारताची प्रक्रिया गतिमान झाली असती. अशाने संवैधानिक मूल्यांची कदर करणारा बौद्ध धम्म हा व्यापक समाजाची धारणा करणारा धम्म ठरला असता परिणामी धर्मनिरपेक्ष लोकशाहीला असलेला धर्मांध शक्तींचा धोका टळला असता.
मुंबई विद्यापीठ सिनेटचे सदस्य प्रा. डॉ. सोमनाथ कदम याप्रसंगी बोलताना म्हणाले की, धम्मक्रांतीनंतर बौद्ध समाजात सर्वच क्षेत्रात परिवर्तन येऊन हा समाज प्रज्ञावान आणि प्रबुद्ध झाला आहे. परंतु धम्मक्रांतीनंतर आलेलं हे परिवर्तन इतर शोषित वंचित घटकांपर्यंत पोहचविण्यात समाजातील प्रबुद्ध विचारवंत कमी पडले असल्याचेही त्यांनी नमूद केले. या परिसंवादात बोलताना पाली रत्नागिरी येथील महाविद्यालयातील अर्थशास्त्राच्या प्रा. कांता कांबळे यांनी धम्मक्रांतीनंतर बौद्ध समाजात आलेल्या समग्र परिवर्तनाचा आढावा घेतलाच परंतु तथागत बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात झालेल्या तिनही धम्मक्रांतींच्या परिप्रेक्ष्यातील घटनांचा तपशील त्यानी सविस्तर मांडला. एकूणच या परिसंवादातील चर्चेने श्रोत्यांना मंत्रमुग्ध आणि विचारप्रवृत्त केले.
परिसंवादाचे प्रास्ताविक इंजि. अनिल जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन जयवंत मोरे यांनी केले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत