भारतमहाराष्ट्रमुख्यपान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२+ विचार .

- माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.
- वाचाल तर वाचाल.
- शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा !
- जो पर्यंत तुम्ही सामाजिक स्वतंत्रता मिळवत नाही तोपर्यंत न्यायालयाने कितीही स्वतंत्रता दिली तरी ती तुमच्या काही कामाची नाही.
- माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो.
- माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये; लाज वाटलीच तर ती फक्त आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची वाटायला हवी.
- ज्या दिवशी मंदिरात जाणाऱ्या लोकांच्या रांगा ग्रंथालयात जाऊ लागतील त्या दिवशी भारत महासत्ता बनेल.
- शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
- आकाशातील ग्रह-तारे जर आपले भविष्य ठरवत असतील तर आपल्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग ?
- जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहीतरी करून दाखवण्याच आहे अशी महत्वकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.
- जो धर्म जनमापासूनच एकाद्याला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ बनवत असेल तर तो धर्म नाही तर गुलाम बनवायचे षडयंत्र आहे.
- भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत