आंतरराष्ट्रीय किर्तिचे भिमाई स्मारकाचे प्रणेते दिवंगत दादासाहेब खरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप- बौध्दाचार्य नारायण जाधव निलजेकर.
दि बुध्दिस्ट कल्चरल ट्रस्ट यांच्या विद्यमाने बुध्दिस्ट कल्चरल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय किर्तिचे भिमाई स्मारकाचे प्रणेते दिवंगत दादासाहेब खरे यांच्या ७८ व्या जयंतीनिमित्त रायगड जिल्ह्यातील झुगेरीवाडी येथे उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रस्टच्या संयोजिका प्रियाताई खरे आणि राजेश खरे, रमेश धर्मा जाधव, अभिमन्यू भालेराव, बौध्दाचार्य नारायण जाधव निलजेकर, बाळाराम जाधव, बंदेश जाधव इ. मान्यवरांनी खूप परिश्रम घेतले आणि सर्वांत जास्त सहकार्य केले आणि सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय रविंद्र काजळेकर सरांनी.झुगेरीवाडी गावात दिडशे घरं फक्त आदिवासी बांधवांची आहेत. त्या गावचे माजी सरपंच रखमा पारधी, सदस्य सुनिल साधला, भाऊ दादा, पोलिस पाटील जनार्दन पारधी नाना पारधी, गणपत देवरे.महात्मा गांधी जयंती दिनाची सुट्टी असूनही सव्वाशे ते दिडशे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.उपस्थित सर्वांना नाष्टा आणि चाॅकलेट वाटप करण्यात आले.नंतर सफाई अभियान राबवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत