डॉ वाघमारे यांच्या हस्ते डॉ एम एन वानखेडे यांच्यावरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन

डॉ एम एन वानखेडे जन्म शताब्दी निमिती ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक यशवंत मनोहर यांनी संपादित केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत माजी कुलगुरू डॉ जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत डॉ सुरेश वाघमारे अँड मंचकराव डोणे कला पंढरीचे बी पी सूर्यवंशी वनाधिकारी साबळे उपस्थित होते
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या १४ विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पाठवले होते त्यापैकी एम एन वानखेडे एक होते १९६८ मध्ये त्यांनी वॉल्टर व्हिटमन यांच्या काव्यावर अमेरिकेत पी एच डी केली त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पी एच डी केली डॉ जे एम वाघमारे यांचे ही ते पी एच डी मार्गदर्शक होते डॉ एम एन वानखेडे हे मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य देखील होते एम पी एस सी चे अध्यक्ष देखील होते त्यांचे दलीत साहित्य चळवळ शिक्षण क्षेत्रात महत्व पूर्ण कार्य आहे एम एन वानखेडे यांच्या या सर्व कार्याची ओळख व्हावी म्हणून डॉ यशवंत मनोहर यांनी त्यांच्यावर गौरव ग्रंथ काढला मध्ये डॉ जनार्दन वाघमारे डॉ सुरेश वाघमारे यांच्या सह अन्य ६७ विचारवंतांचे लेख व यशवंत मनोहर सरांनी घेतलेली एक मुलाखत आहे एम एन वानखेडे यांच्या कार्याची ओळख नवीन पिढीला व्हावी या साठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात या ग्रंथाचे प्रकाशन करून या चर्चा करावी ही संपादक मनोहर सरांची भूमिका आहे या भूमिकेतूनच या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले लवकरच विविध अभ्यासकांना निमंत्रित करून एका विशेष कार्यक्रमात या ग्रंथा विषयी चर्चा घडवून आणली जाणार आहे असे डॉ सुरेश वाघमारे यांनी सांगितले आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत