खासगी अनुदानित शाळांतही आता मूल्यमापन चाचणी

राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची आता संकलित मूल्यमापन चाचणी घेण्यात येणार आहे. याबाबत राज्य शासनाने मान्यता दिली आहे. तसेच खर्चासाठी १४ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे.राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात राबविण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
राज्यात जेवढे विद्यार्थी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेतात, जवळपास तेवढेच विद्यार्थी खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेतात. अध्ययन निष्पत्ती निश्चित करण्यासाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्या हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी नियतकालिक मूल्यांकन चाचण्या या महत्त्वपूर्ण उपक्रमापासून वंचित राहू नयेत यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्याबाबत योजनेंतर्गत राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी या चाचण्यांचे आयोजन व निधी उपलब्ध करून दिला जाईल. चाचणी विकसन कार्यशाळा, कागद खर्च, छपाई खर्च, वाहतूक खर्च इत्यादी घटकांसाठी निधी खर्च करावा, असेही शासन निर्णयात नमूद केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत