6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगात सुनावणी घेण्यात येणार आहे.निवडणूक आयोगात उद्या दुपारी 3 वाजता राष्ट्रवादी प्रकरणाची सुनावणी होणार.
शरद पवार गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहेत. शरद पवार गटाकडून तब्बल आठ ते नऊ हजार शपथपत्र दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेचा वाद संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि त्याच्यानंतर आता उद्यापासून अजून एक वेगळी लढाई सुरू होणार आहे. उद्या दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबत पहिली सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाकडून या सगळ्या संदर्भात तयारी करण्यात आली आहे. आज शरद पवार गटाकडनं दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये कार्य समितीची एक बैठक सुद्धा बोलवण्यात आलेली आहे. निवडणूक चिन्ह गोठवलं गेलं किंवा जर आपल्या विरोधात निर्णय आला त्याचे काय विपरीत परिणाम होणार? पुढे नेमके कोणते पाऊल उचलायचे हाच या बैठकीचा अजेंडा हा असणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत