बाजारात भाजीपाल्याचे दर कडाडले

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम भाजीपाला उत्पादनाला बसत असून फळभाज्या त्याच बरोबर पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी भाजीपाल्याचे दर कडाडले असून बहुतांश भाज्या महागल्या आहेत. हिरवा वाटाणा, फ्लावर, गवार, शिमला मिरची, हिरवी मिरची, फरसबी, कारली या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. तसेच सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरु असल्याने भाज्यांना मागणी आधीक आहे त्यामुळे भाज्यांच्या दरात १०-२०रुपयांनी वाढ झाली आहे.
मात्र भाज्यांच्या दर वाढीने गृहिणींची मात्र चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे. एपीएमसीत सोमवारी ६८७ गाड्यांची आवक झाली असून यामध्ये टोमॅटो,कोबी, काकडी, भेंडी, वांगी या भाज्यांचे दर स्थिर आहेत तर हिरवा वाटाणा, फ्लावर, गवार, शिमला मिरची, हिरवी मिरची, कारली , फरसबी या भाज्यांच्या दारांनी उसळी घेतली आहे. घाऊक बाजारात हिरवा वाटाणा आधी १२०ते १३० रुपयांवरून आता १४०-१६० रुपयांवर तर गवार ४०-४५ रुवरून ६०-६५रुपयांवर , हिरवी मिरची ३३ ते ४० रुपयांवरून ४६ ते ४८ रु तर शिमला मिरची ४०ते ४५ रुपयांनी उपलब्ध असलेली ६०रुपयांनी विकली जात आहे. तसेच आधी फ्लावर १५-२०रुपयांनी उपलब्ध होता तो आता २२-२४ रुपयांनी विकला जात तर कारली १८-२० रुपयांवरून २२-२४ रुपयांनी आणि फरसबी ४०-४५रुवरून आता ६०-६५ रुपयांनीउपलब्ध आहे. तेच किरकोळ बाजारात हिरवा वाटाणा १८०-२००रुपये किलो तर गवार, शिमला मिरची आणि फरसबी ८०रुपयांनी, कारली आणि फ्लॉवर ४०-५०रुपये तर हिरवी मिरची ६०-८०रुपये किलोने विक्री होत आहे.
घाऊक दर
भाजीपाला आता आधी
वाटाणा १४०-१६० १२०-१३०
गवार ६०-६५ ४०-४५
कारली २२-२४ १८-२०
हिरवी मिरची ४६-४८ ३३-४०
शिमला ६० ४०-४५
फ्लॉवर २२-२४ १५-२०
फरसबी ६०-६५ ४५-५०
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत