परकीय आर्य ब्राम्हणाची ही संस्कृती कोणती रे भाऊ?

दिपक गायकवाड
आर्य म्हणून भारतात ई.स.पू. १४०० मध्ये आलेले परकीय ब्राम्हण हे या भारतीय भूमीचे मुळ रहिवासी नाहीत, हेच मुळसत्य आज आपल्या मुळभरतीयाना माहीत नाही किंवा ते ब्राम्हणी हिंदुत्वाच्या नादात विसरून गेलेत की काय अशी शंका येते. कारण आज मितीला सारेच हिंदू बहुजन आपली संस्कृती व आपला देश त्यांच्या ताब्यात देऊन बसलेलो आहोत व आजही ब्राह्मणी पारतंत्र्यात जगत असताना आपण आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदात जगतो, हाच खरा मुळ भारतीयांचा सर्वात मोठा मूर्खपणा व गुन्हा आहे. गुन्हा या अर्थाने की, जगातला असा कोणताच धर्म नाही की त्या धर्माचे पुरोहित परकीय आहेत. पण याला जगात फक्त आपलाच हिंधू धर्म अपवाद आहे. म्हणजेच हजारो वर्ष केलेल्या वाटचालीत आपल्याला आपले पुरोहित तयार करता आले नाहीत ही मोठी शरमेची व लाजिरवाणी बाब आहे. पण याचा कधी आपल्याला खेद अथवा दु:ख आजपर्यंत वाटले नाही. याचे मोठे आश्चर्य वाटते.
पण याही पेक्षा खरच हा परकीय ब्राम्हनी वर्ग आपला मुळभारतीय हिंदुबहूजनाचा सांस्कृतिक वारसा चलवण्या इतला सक्षम व सांस्कृतिक दर्जाचा आहे का? याविषयी त्यांची संस्कृती तपासून पाहता तसे मुळीच वाटत नाही.
कारण हे परकीय आर्य म्हणजे आपल्या भारतावरील पहीले आक्रमनवादी व पहिले आतंकवादी आहेत. त्यांचे भारतीयावरील आक्रमण हलले जर समजून घ्यायचे असतील तर याला ऋग्वेद हा ग्रंथ साक्षी आहे. या ग्रंथात इंद्र व विष्णू यांनी मिळून शंबर हजार म्हणजे एक लाख मुळभरतीय कसे मारून टाकले याविषयी माहिती देताना म्हणते.
इंद्रविश्णू.दृहिता: शंबरस्य नव पुरो नवंतीश्रच थिष्टम |
शत वरचीन: सहस्त्र च साक हथो अप्रत्यसुरस्य वीरान || ऋ. ७-९९-५
अर्थ:- हे इंद्राविष्णू ,.तुम्ही शंभराची ( शंबर नावाच्या मुळभरभरतीय अनार्यांची) तटबंदीची नव्यांनव शहरे फोडलित. ज्याला जोड नव्हता अशा वीर असुराचे शंबर हजार लोक मारून टाकले.
तसेच ऋग्वेद याच इंद्राने साठ हजार मुळभारतीय मारून टाकल्याची माहिती देताना सांगतो,
त्व श्रध्दाभिर्मदसान: सोमेद्रभितये चुमूरिमिंद्र सिषवप |
त्व रजि पिठीनसे दश स्य नशिष्टी सहस्रा शच्या सचाहन || ऋ. ६-२६-६
याच प्रमाणे इंद्राने काळ्या रंगाच्या मुळभारतीयांची कातडी कशी सोलून काढली आर्य ब्राम्हनाच्या यज्ञ संस्थेला न मानणाऱ्या मुळभारतीयांना , तहानेने व्याकूळ झालेले असताना कसे जाळून मारले याविषयी ऋग्वेद माहिती देताना सांगतो,
इंद्र: समतसू यजमंमार्य प्रावद्वीश्वेशु शतमुतीराजीशू स्वरर्मीळहेश्वाजिशू |
मनवे शासदव्रतातंत्वचं कृष्णामरंधयत |
दक्षत्र विश्व ततृशानमोषती न्यश्रसंमममोषती || ऋ. १-१३०-८
म्हणजेच इंद्र व विष्णूचे मिळून एक लाख साठ हजार मुळभारतीय या परकीय ब्राह्मन वीरांनी ठार मारले. असे ऋग्वेद स्वतः सांगतो. मग प्रश्न हा पडतो की , हे परकीय आर्य ब्राम्हण आक्रमनवादी म्हणून भारतात आलेले नव्हते तर हे काय म्हणून आलेले होते? मग आक्रमणवादी हे आपल्या भारतीयांचे धर्मगुरू कसे काय होऊ शकतात? तसेच ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ वर्णाचे व जातीचे कसे काय होऊ शकतात? कारण या परकीय आर्य ब्राम्हणानी मूळभारतीयांना कसे लुटले याविषयी ऋग्वेद फारच मार्मिकपणे सांगतो. ऋग्ववेद म्हणतो,
विश्वजिते धनजिते स्वरजिते सत्राजिते नृजित उर्वराजिते |
आश्र्वजिते गोजिते अब्जिते भरेंद्राय सोम यजताय हर्यतम || ऋ. २-२१-१
अर्थ:- हे ,शत्रूचे सर्वस्व जिंकणाऱ्या , धन जिंकणाऱ्या ,स्वर्ग जिंकणाऱ्या,सतत जयशाली मनुष्यांना जिंकणाऱ्या,सुपीक शेते जिंकणाऱ्या,शत्रूच्या ताब्यातून जलाशय जिंकून घेणाऱ्या यजन करण्यास योग्य असणाऱ्या इंद्रासाठी सोम ( दारू ) आना व तो त्यास भरवा.
याच युद्धना याच ऋग्वेदात धनसता,भुसाता,गोसाता, अर्कसाता अशी विविध बारा नावे आहेत. म्हणजेच अशा प्रकारे या परकीय आर्य ब्राम्हनानी आपल्या मूळ भारतीयांची धन संपत्ती लुटली आहे व त्यांना आपले गुलाम केले व आपली वैदिक संस्कुती स्थपलेली आहे.
आज जो यांना संस्कृतीचा नेहमीच पुळका येतो व आम्ही फार सुसंस्कृत असल्याचे ते नेहमी ओरडुन सांगतात. ती आर्य संस्कृती मुळातून तपासली तर ,याविषयी ब्राम्हणी कुलाचेच इतिहासाचार्य वि .का. राजवाडे म्हणतात की,
” हरिवंशाच्या दुसऱ्या अध्यायात वर्णन केले आहे की, वसिष्ठ प्रजापतीची मुलगी शतरुपा ही वयात आल्यावर आपला पिता जो वसिष्ठ ,त्याच्याशी पत्निभावाने राहिली.
त्याच ग्रंथाच्या दहाव्या अध्यायात असे विधान केले आहे की, मनूने आपली मुलगी ईला हिच्याशी शरीरसंबंध केला.
“भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास ” या ग्रंथाच्या सत्तावीसाव्या अध्यायात असे लिहिले आहे की, जनहूची मुलगी जानव्ही गंगा,हिने आपला बाप जनहू यालाच आपला पती केले.
हरिवंशाच्या दुसऱ्या अध्यायात.असे लिहिले आहे की, दहा प्रचेत्यानी व त्यांचा पुत्र सोम याने सोमाची मुलगी मरिषा हिच्या ठायी आपापली तेजे घालून दक्षप्रजापती निर्माण केला. पितृदुहितसंबंधाचे तर हे उदाहरण आहेच, शिवाय आजा व नात यांचा संबंध या उदाहरणात दाखवला आहे. याच अध्यायात पुढे असे वर्णन केले आहे की, सोमाचा मुलगा किंवा दोहित्र जो दक्षप्रजापती, याने आपल्या सत्ताविस मुली आपला बाप किंवा आजा जो सोम,त्यास प्रजोत्पादनार्थ दिल्या. येथेही आज्याचा व नातीचा शरीरसंबंध झाल्याचा दाखला मिळतो. हरीवंशाच्या तिसऱ्या अध्यायात असे नमूद केले आहे की, ब्रम्हदेवाचा पुत्र दक्ष याने आपली मुलगी ब्रह्मदेवाला दिली व तिजपसून प्रसिद्ध नारद झाला. ( डा.रावसाहेब कसबे,हिंदुराष्ट्रवाद : स्वा.सावरकरांचा आणि रा.स्व.संघाचा, पृ.३६८/६९)
आजा – नात, बाप – मुलगी यांच्यात जर शरीरसंबंध ठेवल्याचे पुरावे वैदिक साहित्यातच जर उपलब्ध असतील, तर हे परकीय ब्राम्हण स्वतःला सुसंस्कृत कसे काय समजून घेतात व नाकाचे नरसाळे व तोंडचे बोचकुळे करून कसे काय बोलू शकतात की,आम्हीच तेवढे सुसंस्कृत आहे म्हणून? उलट यांना भारतीय संस्कृतीवर बोलण्याचा कोणताच नैतिक अधिकार नाही. हे आता हिंदु बहुजन मूळभारतीयांनी समजून घेतले पाहिजे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत