निराधार महिला व पुरुषानी आधार सिडींगसाठी तुळजापूर तहसिल कार्यालयात शिबीराचे आयोजन

तुळजापूर तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा :- बोळंगे
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत दिव्यांग आजारग्रस्त तसेच श्रावणबाळ योजनेअंतर्गत वयोवृद्ध लाभार्थ्यांना दरमहा महाडीबीटी प्रणाली द्वारे थेट लाभार्थ्यांच्या आधार शिडिंग बँक खात्यात जमा करण्यात येत आहे परंतु अनुदान जमा होण्यासाठी लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट असणे बँक आधार शेडिंग असणे बंधनकारक आहे यासाठी तुळजापूर तहसील कार्यालयात दिनांक ०५ डिसेंबर वार शुक्रवार रोजी शिबिर आयोजित करण्यात आले आहे .
या योजने अंतर्गत लाभ घेणारे लाभार्थी हाताचे बोटाचे ठसे डोळ्यांचा रेटिना स्कॅन होत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या लाभार्थी यांचे आधार कार्ड अपडेट होत नसल्याने त्यांची अनुदान मिळण्यास अडचण येत आहे अनुदान अप्राप्त असल्यामुळे लाभार्थ्याकडून वारंवार या याबाबत विचारणा करण्यात येत आहे अनेक वेळेस या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी धाराशिव यांचे मार्फत श्रावणबाळ , दिव्यांग वयोवृद्ध इंदिरा गांधी योजना व संजय गांधी योजने अंतर्गत ५ डिसेंबर वार शुक्रवार रोजी तुळजापूर तहसील कार्यालयामध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबीरास तुळजापूर तालुक्यातील दिव्यांग अर्धा हजार संध्याकाळी निराधार इंदिरा गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी संबंधित तहसील कार्यालय तुळजापूर येथे उपस्थित राहून आपल्या होत असलेल्या सांग याची पूर्णपणे जानकारी घेऊन आपण ते पूर्ण कराव्यात अशा प्रकारचा आव्हान तुळजापूर तालुक्याचे तहसीलदार अरविंद बोळंगे व नायब तहसीलदार श्रीमती शितल माजलगावकर श्रावणबाळ योजनेचे राहुल वाघमारे व अमित सोनवणे यांनी केले आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



