भारतीय वर्तनशैलीमुळे जगातील समाज कंटाळले का?

आज मॉर्निंग वॉक साठी निघालेल्या एका शीख तरुणीला जिथे जन्म इंग्लंड मध्ये झाला आहे, अशा वीस वर्षीय मूळ भारतीय तरुणीला भारतामध्ये परत जा म्हणून सांगण्यात आलं. इतकच नाही तर तिच्यावर दोन स्थानिकांनी बलात्कार केला.
भारतीय लोकांची संख्या जगभर वाढत चालली आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भारतीय लोक परदेशात स्थायिक झाले आहेत. परंतु त्याच वेळी परदेशातील स्थानिक समाज भारतीयांविषयी कंटाळलेला आणि अस्वस्थ झालेला दिसतो. यामागची कारणं खूप खोलवरची आहेत आणि त्याचा संबंध केवळ आर्थिक किंवा राजकीय नसून मुख्यत्वे वर्तन, संस्कृती आणि सामाजिक सवयींशी आहे.
भारतामध्ये शतकानुशतकांपासून चालत आलेल्या परंपरा, धार्मिक उत्सव, सण-समारंभ, आवाज, आरडाओरडा, आणि शिस्तीचा अभाव ही काही वैशिष्ट्यं आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाली आहेत. पण जेव्हा हीच वागणूक भारतीय परदेशात घेऊन जातात तेव्हा स्थानिक लोकांना त्याचा त्रास होतो.
भारतातील सण, मिरवणुका, डीजे, लग्नसमारंभ हे सर्व इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येऊन साजरे केले जातात की दैनंदिन जीवन विस्कळीत होतं. एखाद्या आजारी व्यक्तीची अॅम्ब्युलन्स वेळेवर हॉस्पिटलला पोहोचू शकत नाही, कारण रस्त्यावर गणेशोत्सवाची मिरवणूक चाललेली असते, डीजेवर गाणी वाजत असतात आणि लोकं ट्रॅफिक थांबवून नाचगाणी करत असतात. अशा प्रकारच्या अनेक घटनांमुळे भारतातच लोक मरतात, मग परदेशात लोकांनी हा गोंगाट का सहन करायचा?
अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारख्या देशांमध्ये कायदा-सुव्यवस्था आणि शिस्त ही लोकांच्या संस्कृतीतच आहे. तिथे रात्री ठराविक वेळेनंतर शांतता पाळली जाते, आवाज कमी ठेवला जातो. लोकांना कामावरून परतल्यानंतर विश्रांती हवी असते, मुलांना अभ्यास करायचा असतो, वृद्धांना झोप घ्यायची असते. पण भारतीय जेव्हा परदेशात लग्न, वाढदिवस किंवा सण साजरे करतात तेव्हा त्यात लाऊडस्पीकर, डीजे, मोठमोठे गटागट करून नाचगाणी, फटाके हे सगळं आलंच. अशा वेळी शेजाऱ्यांना पोलिसांना बोलावण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे स्थानिक समाजात भारतीयांविषयी तिरस्कार आणि चिडचिड निर्माण होते.
युरोपमध्ये अनेकदा हे दिसून आलं आहे की भारतीय आणि पाकिस्तानी समुदायांनी केलेल्या लग्नांमध्ये रात्रभर गोंगाट झाला आणि शेजाऱ्यांनी तक्रार केल्यावर त्यांना दंड बसला. अमेरिकेतल्या काही शहरांमध्ये तर “नॉईज कंप्लेंट” हे भारतीयांच्या कार्यक्रमांशी नेहमी जोडले गेले आहे. जर्मनीसारख्या ठिकाणी तर इतकी शिस्त आहे की रविवारी घरातसुद्धा वॉशिंग मशीन चालवायला शेजाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. मग अशा समाजात भारतीयांचा डीजे, फटाके आणि नाचगाणी किती विचित्र वाटत असेल?
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही भारतीय तरुणांबद्दल तक्रारी येतात की ते सार्वजनिक ठिकाणी गटागट करून मोठमोठ्याने बोलतात, गाणी लावतात, बाईकवरून रेस करतात. स्थानिक लोकांच्या दृष्टीने हे असभ्य वर्तन आहे. त्यामुळे नोकरीच्या, घरभाड्याच्या किंवा शेजारच्या बाबतीत भारतीयांना दुय्यम वागणूक मिळते.
भारतातील सण हे प्रत्यक्षात वैयक्तिक श्रद्धेचे विषय आहेत. पण कालांतराने ते रस्त्यावर उतरले. जेव्हा गणेशोत्सव, नवरात्र किंवा इतर उत्सव सुरू झाले तेव्हा गावोगाव मोठे रस्ते नव्हते. त्यामुळे चौकात किंवा मोकळ्या जागेत लोकं एकत्र येत. पण आज लाखो वाहनं, प्रचंड लोकसंख्या आणि आधुनिक शहरं उभी राहिली आहेत. तरीही आपण सण रस्त्यावरच साजरे करतो. यामुळे कामावर जाणाऱ्या लोकांचा वेळ वाया जातो, ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या अॅम्ब्युलन्समुळे रुग्ण मरतात, शाळेत जाणाऱ्या मुलांना अडथळे येतात.
परदेशी लोकांना हे अजिबात पटत नाही की एखाद्या धर्माच्या नावाखाली सार्वजनिक जीवन थांबवावं. त्यांना वाटतं “जर तुम्हाला आपल्या हिंदू राष्ट्रातसुद्धा या गोष्टी त्रासदायक वाटतात, तर मग आम्ही ख्रिस्ती राष्ट्र किंवा मुस्लिम राष्ट्रात राहून हे का सहन करावं?” हाच तो मुद्दा आहे ज्यामुळे परदेशात भारतीयांविषयी नकारात्मक भावना वाढत चालल्या आहेत.
शेवटी, सण, धर्म, उत्सव हे वैयक्तिक आहेत. ते घरात, मंदिरात, किंवा समाजाच्या मर्यादित जागेत साजरे व्हायला हवेत. पण रस्त्यावर नृत्यसं, डीजे, गोंगाट, आरडाओरडा, मोर्चे हे अत्यंत चुकीचं आणि असभ्य आहे. रस्ते हे सार्वजनिक मालमत्ता आहेत. प्रवासासाठी, कामासाठी, लोकांच्या जीवनरक्षणासाठी. त्यावर वैयक्तिक धर्म किंवा सण लादणं म्हणजे इतरांच्या हक्कांवर गदा आणणं.
भारतीय समाजाने आता या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. अन्यथा “भारतीय लोकं असभ्य, गोंगाटी, आणि शिस्त न पाळणारे” ही प्रतिमा जगभरात घट्ट बसत जाईल. आणि एक दिवस असा येईल की जग भारतीय लोकांना फक्त “कंटाळवाणे आणि त्रासदायक” म्हणूनच पाहील.
आपल्या भारतामध्ये सतत दुसऱ्या धर्माच्या लोकांना किंवा आपल्याला सुद्धा सांगितलं जातं; चला जा पाकिस्ता,न चल निकल देश के बाहर; तर हे जे बीज रोलेल आहे ना तिरस्कारच बाहेर काढण्याचं याचं हळूहळू झाड व्हायला आणि नंतर वृक्ष व्हायला सुरुवात झालेली आहे. कालपर्यंत तुम्ही सांगत होता निकल ज्या देश के बाहर आताच जग सांगत आहे आमच्या देशातून तुमच्या देशात चालते व्हा म्हणून. आणि भारतीयांनी सुद्धा लक्षात ठेवला पाहिजे आपण तिथे पोट भरायला गेलो आहोत तेवढेच काम करायचं फंड साजरी करायची असेल तर इकडे यायचं देशांमध्ये इकडे चालतो गोंधळ घातलेला. इकडे येऊन गोंधळ घालायचा. आत्मा शांत करायचा आणि मग पुन्हा चालतं व्हायचं आणि मग पोट भरायची तिकडे जाऊन. तिथे जाऊन त्यांना कशाला तुमची संस्कृती शिकवताय? तुमची जी महान संस्कृती आहे ती तुमच्या देशात ठेवा. तुमच्या देशाला इतका महान करा, कि ते लोक इथे येतील पोट भरायला, तेव्हा त्यांना दाखवा मग रस्त्यात नाचून.
-डॉ. गौरी साखरे
फोटो : परदेशी नागरिकांच्या लोंढ्यांविरुद्ध लंडनमधील दीड लाख लोकांनी रस्त्यावर येत आंदोलन केलं होतं. ह्या नागरिकांचा मुख्य रोष बेशिस्त आणि अस्वच्छ राहणाऱ्या भारतीयांबद्दल आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत