” ह्यात बदल अपेक्षित आहे.!”

आहेत कारणीभूत राजकारणी, बजबजपुरीला,
राजकारणात फोफावलेल्या, गुंडगिरीला,
आर्थिक भ्रष्टाचाराला,
पण दोष दिसत नाहीत का?,
मतदार म्हणुन,
आपलाच आपल्याला.!
वर्षांतून पाच, मिळे एकदा,
संवैधानिक हक्क मतदानाचा,
योग्य उमेदवार, निवडून देण्याचा,
देशाच्या विकासासाठी,
कर्तव्य बजावण्याचा.!
असे ताकद, अफाट त्यात,
उलथून टाकी,
भल्याभल्यांचे पडताळे, क्षणार्धात,
घरी बसविण्याची, कुचकाम्याना,
क्षमता असे भरभरून त्यात.!
चाळता पाने इतिहासाची,
सामाजिक सुधारणांत,
राजकिय आंदोलनांत,
दिसे भूमिका मध्यम वर्गाची,
पण तोच वर्ग दिसतो उदासीन,
मतदान करण्यात,
सहली, पार्ट्या करीती,
मतदानाच्या सुट्टीच्या दिवसात.!
राजकारणी करीती लक्ष,
गरीब वस्त्यांना,
अन चौफेर वाढलेल्या झोपडपट्टय़ांना,
पुरविली सोयी, सुविधा, कितीतरी बेकायदेशीर,
खात्रीने मतदान करणार्यांना.!
सकाळ, संध्याकाळी प्रचाराचे,
ते ही घेत नाहीत, कष्ट फुकटात,
मुल्य असे हजार, दोन हजारात,
बिर्याणी अन बाटलीची,
सोय असे रात्रीच्या अंधारात ,
मतदान ही विकती,
चार, पाच अंकी रुपयांत.!
मतदान ही विकती,
चार, पाच अंकी रुपयांत.!!
मतदान ही विकती,
चार, पाच अंकी रुपयांत.!!!
अरुण निकम.
9323249487.
मुंबई.
दिनांक…30/08/2025.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत