बौद्धांनो खंबीर भूमिका घ्या

भारतातील ख्रिश्चन, पारसी, जैन, मुस्लिम, शीख हे दिवाळी करत नाही. दिवाळी करत नाहीत म्हणून ते लाजतही नाहीत. ते सुद्धा स्वभिमानाने जीवन जगत आहेत. मग बौद्ध लोकांनाच कसली लाज वाटते?
तुमच्या आंबेडकर जयंतीला एखादा ब्राह्मण १० रुपयाचा फटाका तरी फोडतो का? ब्राह्मण सोडा, एखादा कट्टर मराठा किंवा सामान्य ओबीसी हिंदू घरात फराळ तरी बनवितो का?
अरे बुद्ध जयंती ला सुद्धा तुम्हाला कोणीही शुभेच्छा देत नाहीत, आणि म्हणे बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार आहे. अहो, आंबेडकर जयंतीला तुम्हाला तुमचे मित्र, बाजूवाले शुभेच्छा तरी देतात का?
म्हणून दिवाळी साजरी करणाऱ्यांना तुमच्या बौद्धतर, जे बुद्धिस्ट नाहीत त्यांना शुभेच्छा द्या. कोणासाठी द्वेष ठेऊ नका, कर्म कांड करू नका. दिवाळीच्या लक्ष्मी पुजनला रात्रभर दरवाजे खुले ठेऊन किती हिंदू महार श्रीमंत झाले?
२५०० वर्षात तुम्ही अब्जाधीश व्हायला पाहिजे होता. तुम्ही गावाच्या बाहेर पाण्यालाही वंचित झाला. गावातील गुरे ढोरे सुद्धा तुमच्या पेक्षा सरस ठरली. असला हा हिंदू धर्म तुम्हाला गुलाम समजतो.
म्हणून, २२ प्रतिज्ञा विसरू नका. तुमचे अस्तित्व राम विष्णू मुळे नसून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे. आपल्या पूर्वजांच्या स्मृतीचा अपमान होतो, असा दिवाळी सन साजरा
करू नका. बाबासाहेबांच्या विचाराशी गद्दारी करू नका.
त्यापेक्षा त्या पैशाने तुमचा आणि बायकोचा विमा उतरावा. कुटुंबाचा मेडिक्लेम काढा. म्युचियल फंड मध्ये गुंतवणूक करा. फिक्स डिपोजीट मध्ये पैसे टाका. किसान विकास पत्र काढा.PPF काढा. वरील सर्व काढले असेल, तर हुशारीने शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करा. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे जमा करा. स्वतःच्या व्यवसाया साठी पैसे जमा करा. स्वतःच्या घरासाठी पैसे जमा करा. अनाथ गरिबांना अन्न दान करा.
जय भीम
भारतीय घटनेचे शिल्पकार या ग्रुपवरून साभार
🌹💐☸️🙏🏻🙏🏻🙏🏻
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



