देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

जलजीवन मिशन भ्रष्ट्राचार, चोराच्या हातात चौकशी कशी ? – राजेंद्र पातोडे.

जि प मधील काही अधिकारी आणि विशिष्ट कंत्राटदार यांची साखळीने जलजीवन मिशन कामात संपूर्ण जिल्ह्यात हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला असून शासनाने दिलेल्या चौकशी आदेशा नंतर पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता कडूनच चौकशी होणार असल्याने जिल्हा परिषद प्रशासन जल जीवन मिशन कामाची चौकशी करण्यास जाणीवपूर्वक टाळत असून चोरांच्या हातात चौकशी देऊन काय साध्य होणार आहे असा सवाल राजेंद्र पातोडे ह्यांनी उपस्थित केला आहे.

जलजीवन मिशन कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाल्याने अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत.अकोला जिल्ह्यात प्रत्येक घरी नळ आणि दरडोई ५५ लिटर पाणी देण्याचे नियोजन असलेली जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेची कामे कागदोपत्री पूर्ण झाली आहेत. जवळजवळ
१५८६७.१० कोटी अंदाजपत्रिय तरतूद असून १३०५२.२२ कोटी आता पर्यंत कामावर खर्च झाले आहेत. २८४ पेकी ११२ कामे पूर्ण झाल्याची आकडेवारी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने दिली आहेत.यात प्रचंड घोळ आहे. दिल्ली वरून केंद्र सरकारने पाठवलेली खाजगी कंपनी आणि ग्रामीण पाणी पुरवठा, विभागीय व शाखा अभियंते आणि कार्यकारी अभियंता पासून कंत्राटदार ह्यांनी पूर्ण योजना अर्धवट टाकून मोठा भ्रष्टाचार केला आहे. गेली दोन वर्षांपासून गावातील प्रमुख रस्ते खोदकाम करून टाकले आहेत. शास्वत पाणी पुरवठा सोर्स नसताना मुख्य पाईप लाईन्स आणि वितरण व्यवस्था पूर्ण झाल्याचे सांगून बिले काढण्यात आली आहेत. एकाही गावात लोकवर्गणी जमा नाही.
मात्र तरीही त्या गावांना पाणी मिळत नाही.ह्याची चौकशी करून कार्यवाही साठी शासना कडे तक्रार करण्यात आली होती.त्यानुसार राज्य पाणी व स्वच्छता मिशन कडून जा. क्र. SWSM-१८०११(५५)/१४/२०२५-Est-WS-२५ दिनांक: २७/०६/२०२५ रोजी अत्यंत महत्वाचे / कालमर्यादा नमूद करून मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, अकोला ह्यांना अकोला जिल्हा परिषद अंतर्गत जल जीवन मिशन कामांची चौकशी करणे बाबत पत्र देण्यात आले होते.त्यानुसार सदर तक्रारीच्या अनुषंगाने नियमोचित कार्यवाहीकरुन वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे.विजय जायकर कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन ह्यांनी सदर पत्र काढले असून त्यांच्या प्रति मुख्यमंत्र्यां सोबतच अकोला जिल्हाधिकारी, मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, अमरावती तसेच कार्यकारी अभियंता, राज्य पाणी व स्वच्छता मिशन, बेलापूर, नवी मुंबई ह्यांना देखील पाठविण्यात आल्या आहेत.
असे असताना जिल्हा परिषद प्रभारी कार्यकारी अभियंता मिलिंद जाधव यांनी वर्तमान पत्रांना प्रतिक्रिया देत चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कंत्राटदार तसेच खाजगी कंपनी कडून झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी मिलिंद जाधव ह्यांचे नेतृत्वात कशी होऊ शकते? ज्यांनी चोरी केली आहे त्यांनीच चौकशी केली तर त्यातून निष्पक्ष चौकशी कशी होऊ शकते? प्रभारी कार्यकारी अभियंता मिलिंद जाधव ह्यांचे कडे असलेल्या बाळापूर विभागात सर्वात जास्त भ्रष्ट्राचार झालेला आहे.त्यामुळे जाधव हे स्वतःच्या भ्रष्टाचाराची चौकशी कशी करणार आहेत ? हे सर्व मॅनेज पद्धतीने सुरू असून जिल्हा परिषद प्रशासन हे जिल्ह्यातील नागरिकांच्या पाणी पुरवठा विषयावर गंभीर नसून भ्रष्ट्राचारी व्यवस्थेची पाठराखण करीत असल्याचे राजेंद्र पातोडे ह्यांनी म्हटले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!