.. माणसा, तू आहेस ग्रेट…….

मनोगत
फिरतसे नग्न, रानटी अवस्थेत,
दऱ्या, खोऱ्यात, कडे कपाऱ्यात,
नसे भान तुज , अन्न शिजवण्याचे,
जगतसे खाऊनी,
कंदमुळे, अन् फळे,
तर कधी भागे भूक तुझी,
तोडून लचके जनावरांच्या,
कच्च्या मांसाचे.!
फिरते चक्र विश्वाचे ,
काळानुकाळ,
आपल्या गतीने,
ऋतुही येती, चक्रानुसार,
सूर्योदय अन् सूर्यास्त होई, नियोजित वेळेनुसार.!
न चालली, मती कुणाची इथवरी,
करण्या, बदल भुवरी,
पशु, प्राणी, पक्षी, जलचर,
अन सकल सजीव,
वावरती स्वैरपणे, आपल्यापरी,
न ओलांडता,
वाट, वहिवाट अन पायरी.!
तल्लख असे , मेंदू मानवी,
पोट भरण्यापरी, तो सोयी, सुविधांचा विचार करी,
साधली प्रगती , गतीने मंद जरी,
करून मात गरजांवरी.!
पडता फळ भुईवर,
शोध गुरुत्वाकर्षणाचा लावला,
भेदले अंधाराला,
झगमगवले विजेने जगाला,
सजवलेस शिल्प,
पोखरून डोंगराला,
दिलेस आगळे रूप,
ओबडधोबड काताळाला .!
झेपावलास घेत, वेध आकाशाचा,
लावुनी शोध विमानाचा,
मारलीस फेरी, ल्यूनिकने चंद्राला,
न वाटे समाधान मनाला,
ठेऊनी पाऊल चंद्रावर,
झेपावला, भिडण्या मंगळाला!
नाव दिलेस, या पृथ्वीला,
सूर्य, चंद्र, ग्रह, तारे,
अन अवकाशाला,
चराचरातील कणा कणाला,
जन्माआधी तुझ्या, होते अनामिक,
समूची तारांगण,
अन कण ना कण, या पृथ्वीचा.!
अन कण ना कण, या पृथ्वीचा.!!
अन कण ना कण, या पृथ्वीचा.!!!
अरुण निकम,
9323249487.
मुंबई.
25/05/2025.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत